Billions of bids are auctioned on Prime Minister Modi's Rs 500 photo | पंतप्रधान मोदींच्या 500 रुपयांच्या फोटोवर लिलावात लागली कोट्यवधीची बोली
पंतप्रधान मोदींच्या 500 रुपयांच्या फोटोवर लिलावात लागली कोट्यवधीची बोली

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा लिलाव सध्या सुरू आहे. त्यामध्ये केवळ 500 रुपये प्राथमिक किंमत असलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या एका फोटोवर तब्बल ओक कोटी रुपयांची बोली लागली. 

गेल्या सहा महिन्यांमध्ये देशाच्या विविध भागांत केलेल्या दौऱ्यांदरम्यान नरेंद्र मोदी यांना विविध भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या वस्तूंचा लिलाव सध्या सुरू आहे.  यामध्ये गुजरातीमध्ये संदेश लिहिलेल्या  मोदींच्या एका फोटोला एक कोटी रुपये एवढी किंमत मिळाली. तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मोदींना दिलेल्या रुपेरी कलशाची बेसप्राइज 18 हजार रुपये ठेवण्यात आली होती. दरम्यान, या रुपेरी कलशालवरही ओक कोटी रुपयांची बोली लागली. 

मोदींना भेटवस्तू मणून मिळालेल्या या वस्तूंचा लिलाव 14 सप्टेंबरला सुरू झाला असून, तो 3 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या लिलावामध्ये  2 हजार 772 वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंसाठी 200 ते 2 लाख रुपयांपर्यंत आधारभूत किंमत ठरवण्यात आली आहे. 

Web Title: Billions of bids are auctioned on Prime Minister Modi's Rs 500 photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.