Video - "आता यांना निलंबित करूनच मी..."; गाडी अडवल्याने भाजपा नेत्याची पोलिसांवर दादागिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 07:40 PM2021-12-02T19:40:34+5:302021-12-02T19:53:19+5:30

BJP Jivesh Mishra Video : बिहारमधले भाजपाचे मंत्री जीवेश मिश्रा (BJP Jivesh Mishra) यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

bihar minister jivesh mishra gets angry after his car is stopped in assembly premises by police | Video - "आता यांना निलंबित करूनच मी..."; गाडी अडवल्याने भाजपा नेत्याची पोलिसांवर दादागिरी

Video - "आता यांना निलंबित करूनच मी..."; गाडी अडवल्याने भाजपा नेत्याची पोलिसांवर दादागिरी

Next

नवी दिल्ली - भाजपा नेत्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे राजकारण तापलं आहे. रस्त्यावर अडवलं म्हणून नेत्याने थेट पोलिसांवर दादागिरी केल्याची घटना समोर आली आहे. "आता यांना निलंबित करूनच मी अधिवेशनाला जाईन" असं म्हणत भाजपा नेत्याने अरेरावी केली आहे. बिहारमधले भाजपाचे मंत्री जीवेश मिश्रा (BJP Jivesh Mishra) यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या व्हिडिओमध्ये मिश्रा हे पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या धमक्या देताना दिसत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, जीवेश मिश्रा हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी जात होते. गाडीतून जात असताना एका पोलिसाने त्यांना अडवलं. त्यामुळे ते प्रचंड चिडले. मिश्रा यांनी "आम्ही सरकार आहोत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आधी जाता यावं, म्हणून या पोलिसांनी एका मंत्र्याला अडवलं. त्या दोघांना आधी जाता यावं म्हणून एका मंत्र्याला त्यांनी थांबवत वाट बघायला लावली, हा कुठला कायदा आहे?, आता, या अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतरच मी विधानसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहीन" असं म्हटलं आहे. 

अधिकाऱ्यांनी आपला अपमान केला असल्याचा आरोप 

गाडी थांबवल्याने  मिश्रा चांगलेच संतापले होते. अधिकाऱ्यांनी आपली चूक झाल्याचं मान्य़ केलं पण तरी देखील भाजपा नेत्याने काहीचं ऐकून घेतलं नाही. त्यांनी अधिकाऱ्यांनी आपला अपमान केला असल्याचा आरोप केला आहे. याआधी देखील काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. राष्ट्रीय जनता दलाचे नेते भाई वीरेंद्र आणि भाजपा नेते संजय सरावगी या दोघांच्यात विधानसभा परिसरातच बाचाबाची झाली. एकमेकांविरोधात आक्षेपार्ह टीकाही केल्या. मात्र माध्यमांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झालं. जीवेश मिश्रा यांच्या या विधानावर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: bihar minister jivesh mishra gets angry after his car is stopped in assembly premises by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.