शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:25 IST

Bihar Election Result 2025: बिहारमध्ये एनडीए डबल सेंच्युरीकडे पोहोचली असून १९८ जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. अशातच नितीशकुमार यांच्या गोटात मोठी अस्वस्थता दिसून येण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये एनडीए डबल सेंच्युरीकडे पोहोचली असून १९८ जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. अशातच नितीशकुमार यांच्या गोटात मोठी अस्वस्थता दिसून येण्याची शक्यता आहे. कारण नितीशकुमार यांच्या पक्षाशिवायही एनडीए बहुमताकडे जाण्याची शक्यता आहे. जदयूशिवाय एनडीएने ११८ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्तास्थापनेसाठी १२२ जागांची गरज आहे. यामुळे बिहारमध्ये भाजपा नितिशकुमार यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याची रणनिती आखण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. 

बिहारच्या राजकारणात मागील दोन दशकांपासून 'सुशासन बाबू' अशी ओळख असलेले नितीश कुमार हे कोणत्याही आघाडीचे अविभाज्य घटक राहिले आहेत. त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिका आणि वाढत्या वयामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपने या कमकुवतपणाचा फायदा घेऊन बिहारमध्ये आपले स्वतंत्र वर्चस्व स्थापित करण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 

१. समान जागांचे समीकरण२०२० मध्ये जदयूने भाजपपेक्षा जास्त जागा लढवूनही व कमी जिंकूनही भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद दिले होते. मात्र, २०२५ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा वाटून घेतल्या. भाजपने अत्यंत शांतपणे हा राजकीय समतोल साधला आहे. या ‘समान जागा’ सूत्रामागे भाजपचा छुपा अजेंडा आहे: जर जदयूचे संख्याबळ कमी झाले आणि भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरेल, व मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, याची तयारी ठेवणे हा होता. 

२. चिराग पासवान यांची 'घरवापसी'चिराग पासवान यांच्या लोजपा (राम विलास) पक्षाला NDA मध्ये पुन्हा मानाचे स्थान देणे, हे देखील भाजपच्या धोरणाचा भाग आहे. चिराग यांना २९ जागा देऊन भाजपने दलित आणि युवा मतांना आकर्षित केले आहे. चिराग पासवान यांचे वाढते वजन अप्रत्यक्षपणे नितीश कुमारांचे पक्षांतर्गत महत्त्व कमी करणारे ठरत आहे.

३. नेतृत्वाचा पर्याय खुला भाजपने निवडणुकीपूर्वी नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून स्पष्टपणे जाहीर न करण्याची खबरदारी घेतली आहे. 'डबल-इंजिन सरकार' या घोषणेवर अधिक भर देऊन, भाजपने भविष्यातील नेतृत्वाचा पर्याय खुला ठेवला आहे. निकालांनंतर, भाजप नितीश कुमारांशिवाय सरकार बनवण्याचा किंवा त्यांच्या भूमिकेत मोठा बदल करण्याचा विचार करू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar: BJP could form government without Nitish Kumar, JDU falters.

Web Summary : Bihar NDA leads, but JDU's weakness allows BJP to strategize for power. BJP's clever seat allocation, alliance with Chirag Paswan, and open leadership options hint at a possible shift in Bihar's political landscape, potentially sidelining Nitish Kumar.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेड