Chamki Fever: बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने 137 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 11:04 AM2019-07-03T11:04:11+5:302019-07-03T11:11:36+5:30

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 137 मुलांचा मृत्यू झाला आहे.

Bihar Death toll due to AES rises to 137 in Muzaffarpur. 116 dead at SKMCH and 21 at Kejriwal Hospital | Chamki Fever: बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने 137 जणांचा मृत्यू 

Chamki Fever: बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने 137 जणांचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देबिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे.एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 137 मुलांचा मृत्यू झाला आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात 116 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल रुग्णालयामध्ये 21 मुलांचा मृत्यू झाला आहे.

मुजफ्फरपूर  - बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 137 मुलांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपूरमध्ये इन्सेफेलाईटीस या आजाराने आणखी 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात 116 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल रुग्णालयामध्ये 21 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात मुलांना ताप येतो. त्यांच्यावर सध्या अनेक रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुले या इन्सेफेलाईटीस तापाने दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने 22 मुलांचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्याआधी हा आजार होत असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. 


2014 पासून इन्सेफेलाईटिस हा आजार मुलांना होत आहे. पाच ते दहा वयोगटातील मुलांना हा आजार होतो. तसेच यामुळे दरवर्षी अनेक मुलांचा मृत्यू होतो. मात्र तरीही सरकारने याबाबत अज्ञाप गंभीर दखल घेतलेली नसल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. डोकं दुखणं, अशक्तपणा येणं, उलट्या होणं, भूक न लागणं, अतिसंवेदनशील होणं ही या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळे अशा गोष्टींचा त्रास होत असल्याचं त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

लिची खाल्ल्याने बिहारमधील बालकांचा मृत्यू? जाणून घ्या खरे कारण

लिची हे फळ खाल्ल्याने बिहारमध्ये अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत 179 या तापाचे संदिग्ध रुग्ण आढळले आहेत. रिकाम्या पोटी लिची खाल्ल्याने मुले या रोगाची बळी पडल्याचे सांगितले जाते. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम  (AES) म्हणजे शरिरातील मुख्य मज्जासंस्थेला प्रभावित करतो. लहान मुलांची मज्जासंस्था कमजोर असल्याने त्यावर जास्त परिणाम होतो. सुरुवातीला जोरदार ताप येतो. यानंतर शरीर दुखणे, हालचालीवर परिणाम, मानसिक अस्वस्थता, बेशुद्ध होणे, आकड्या येणे, भीती, कोमामध्ये जाणे अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. हा आजार जून ते ऑक्टोबर दरम्यान बळावतो. 

लिचीचे कनेक्शन काय?

'द लॅन्सेट' नावाच्या मोडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये लिचीचे प्राकृतिक रूप हाइपोग्लीसीन ए मध्ये मोडते. यामुळे शरीरात फॅटी अ‍ॅसिड बनविण्यास व्यत्यय येतो. यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण घसरते आणि मेंदूशी संबंधीत आजार वाढू लागतो. सकाळी किंवा सायंकाळी उपाशीपोटी लिची न खाण्याचा सल्ला बिहारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. बिहारमध्ये कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. यामुळे तेथील मुले कमजोर असतात. यामुळे या सिंड्रोमचा जादा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

Web Title: Bihar Death toll due to AES rises to 137 in Muzaffarpur. 116 dead at SKMCH and 21 at Kejriwal Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.