Video: 'IAS बनून माझ्या अंडर काम कर', सोनूने तेजप्रताप यादवांना दिलं जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 02:27 PM2022-05-18T14:27:20+5:302022-05-18T14:31:22+5:30

बिहारच्या नालंदा येथील 12 वर्षीय सोनू सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे

Bihar boy Sonu: 'Become an IAS and work under me', Sonu nalanda boy gave a strong answer to Tejpratap Yadav, video viral | Video: 'IAS बनून माझ्या अंडर काम कर', सोनूने तेजप्रताप यादवांना दिलं जबरदस्त उत्तर

Video: 'IAS बनून माझ्या अंडर काम कर', सोनूने तेजप्रताप यादवांना दिलं जबरदस्त उत्तर

googlenewsNext

पाटणा - बिहारमधील एका छोट्या चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि आमदार तेजप्रताप यादव यांना या लहानग्याने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत. सोनू नावाच्या या मुलाने तेजप्रताप यादव यांना रोखठोक शब्दात सुनावले. हे पाहून दिग्दर्शक विनोद कापरी यांना दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचीच आठवण झाल्याचं त्यांनी म्हटलं. 

बिहारच्या नालंदा येथील 12 वर्षीय सोनू सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोर बिनधास्तपणे आपले गाऱ्हाणं मांडल्यामुळे सोनू चर्चेत आला. सरकारी शाळेतल्या शिक्षकाला इंग्रजी येत नाही, मला इंग्लीश मीडियमध्ये शिक्षण द्याव, अशी मागणीच त्याने नितीश कुमार यांच्याकडे केली होती. आता, राजदचे आमदार तेजप्रताप यादव यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सोनूला साधलेला संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिग्दर्शक विनोद कापरी यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओत तेजप्रताप यादव हे व्हिडिओ कॉलिंगद्वारे चिमुकल्या सोनूचं कौतूक करत आहेत. मी तुझा फॅन झालोय, तू धाडसी आणि स्मार्ट मुलगा आहे. तू बिहारचा स्टार आहेस, असे तेजप्रताप यांनी म्हटलं. त्यावर, आपण काका या नात्यानं माझा शाळेत प्रवेश करुन द्या असे सोनूने म्हटले. त्यावर, तू मोठा होऊन काय बनणार आहेस, असा प्रश्न तेजप्रताप यांनी विचारला. त्यावर, मी आयएएस बनेल, असे उत्तर सोनून दिले. तेव्हा, मी बिहारच्या सरकारमध्ये येईल, तोपर्यंत तूही आयएएस होशील. मग, तू माझ्या अंडर काम करशील, असे तेजप्रताप यांनी म्हटलं. तेजप्रताप यांच्या प्रश्नावर सोनूने दिलेल्या उत्तराने तेजप्रताप हेही अवाक् झाले. मी कुणाच्याही अंडर काम करणार नाही, जर तुम्ही माझी मदत करत असाल तर धन्यवाद.. असे सडेतोड आणि बिनधास्त उत्तर सोनूने दिले. या उत्तरामुळे सोनूचा हा व्हिडिओ कॉल सगळीकडे व्हायरल झाला आहे. 


दिग्दर्शक विनोद कापरी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामध्ये, लय भारी पोरगंय हे, स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा अंगात भिनलाय याच्या. हे पाहून अमिताभ बच्चन यांचा दिवार सिनेमा आठवला. ''मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता'', अशी कमेंट आणि आठवण विनोद कापरी यांनी ट्विटरवर लिहिली आहे. 

Web Title: Bihar boy Sonu: 'Become an IAS and work under me', Sonu nalanda boy gave a strong answer to Tejpratap Yadav, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.