बिहारमध्ये विजेचे तांडव, दिवसभरात ८३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 07:25 PM2020-06-25T19:25:34+5:302020-06-25T19:42:11+5:30

राज्यातील २३ जिल्ह्यांत वीज कोसळून दुर्घटना घडल्या असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

In Bihar, 83 people were killed and many others injured in a day of lightning | बिहारमध्ये विजेचे तांडव, दिवसभरात ८३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

बिहारमध्ये विजेचे तांडव, दिवसभरात ८३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

googlenewsNext

पाटणा - मान्सूनचे आगमन होत असताना आज बिहारमध्ये विजांच्या कडकडाटाने तांडव केले. राज्यातील विविध भागात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये सुमारे ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये वीज कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील २३ जिल्ह्यांत वीज कोसळून दुर्घटना घडल्या असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक हानी गोपालगंज जिल्ह्यात झाली असून, इथे वीज कोसळून झालेल्या अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मधुबनी आणि नबादा जिल्ह्यात प्रत्येकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमधील आठ जिल्हे असे आहेत जिथे वीज कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये गोपालगंज, पूर्व चंपारण्य, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी आणि नबादा या जिल्ह्यांचा समावेश आहे.  

death-toll_062520064506.jpg

बिहारबरोबरच उत्तर प्रदेशमध्येही आज वीज कोसळल्यामुळे दुर्घटना घडल्या. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला.  उत्तर प्रदेशातील देवरिया येथे वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. तर बाराबंकी जिल्ह्यात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

Web Title: In Bihar, 83 people were killed and many others injured in a day of lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.