काही दिवसांपूर्वी १.१७ कोटी रुपयांची विक्रमी बोली लागल्यामुळे देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट म्हणून चर्चेत आलेली 'HR 88 B 8888' ही फॅन्सी नंबर प्लेट आता पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हरियाणा परिवहन विभाग या क्रमांकाचा पुन्हा लिलाव करणार आहे. ज्या व्यक्तीने ही बोली लावली होती, त्याला आता ती खूपच महाग वाटू लागली आहे. यामुळे त्याने ती घेण्यास नकार दिला आहे.
या महागड्या नंबर प्लेटच्या पुन्हा लिलावाचे कारण अत्यंत आश्चर्यकारक आहे. काही दिवसांपूर्वी या नंबर प्लेटसाठी झालेल्या लिलावात बोली ५० हजार रुपयांपासून सुरू झाली आणि १.१७ कोटी रुपयांवर थांबली होती. सुधीर कुमार नावाच्या व्यक्तीने ही विक्रमी बोली लावून नंबर आपल्या नावावर आरक्षित केला होता. नंबर आरक्षित केल्यानंतर, नियमांनुसार एका निश्चित वेळेत सुधीर कुमार यांना १.१७ कोटी रुपयांची पूर्ण रक्कम परिवहन विभागाकडे जमा करणे आवश्यक होते. मात्र, कुमार यांनी ही रक्कम जमा केली नाही.
सुधीर कुमार यांनी परिवहन विभागाला कळवले की, "गाडीची नंबर प्लेट खूप महाग झाली आहे आणि मी इतकी मोठी रक्कम भरू शकणार नाही." त्यामुळे, १.१७ कोटी रुपयांची बोली लागूनही 'HR 88 B 8888' हा क्रमांक भारताची सर्वात महागडी नंबर प्लेट बनण्याची संधी हुकली आणि आता हरियाणा परिवहन विभाग हा नंबर पुन्हा एकदा लिलावासाठी काढणार आहे.
या नंबर प्लेटचा लिलाव येत्या शुक्रवारपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. या क्रमांकाची आरक्षित किंमत पुन्हा ५० हजार रुपये असणार आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी १० हजार रुपये जमा करावे लागतील. जर बोली जिंकणाऱ्या व्यक्तीने निश्चित वेळेत रक्कम जमा केली नाही, तर जमा केलेले १० हजार रुपये परत मिळणार नाहीत.
Web Summary : A fancy number plate 'HR 88 B 8888', once sold for ₹1.17 crore, is back for auction. The buyer backed out, deeming it too expensive. Haryana transport restarts bidding at ₹50,000.
Web Summary : एक फैंसी नंबर प्लेट 'HR 88 B 8888', जो कभी ₹1.17 करोड़ में बिकी थी, फिर से नीलाम होगी। खरीदार ने इसे बहुत महंगा मानते हुए खरीदने से इनकार कर दिया। हरियाणा परिवहन ₹50,000 से बोली फिर शुरू करेगा।