धक्कादायक! PUBG खेळण्यासाठी इंटरनेट रिचार्जला आईचा नकार; मुलाने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 04:14 PM2020-05-24T16:14:13+5:302020-05-24T16:16:11+5:30

जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. आईने पबजी खेळण्यासाठी हवा असलेला इंटरनेट पॅक मारण्यासाठी नकार दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

bhopal youth commits suicide in bagsevania for internet recharge SSS | धक्कादायक! PUBG खेळण्यासाठी इंटरनेट रिचार्जला आईचा नकार; मुलाने उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! PUBG खेळण्यासाठी इंटरनेट रिचार्जला आईचा नकार; मुलाने उचललं टोकाचं पाऊल

googlenewsNext

भोपाळ - पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. आईने पबजी खेळण्यासाठी हवा असलेला इंटरनेट पॅक मारण्यासाठी नकार दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्ये प्रदेशातील भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. इंटरनेट रिचार्जसाठी आईने पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नीरज असं या मुलाचं नाव असून तो बागसेवनियाचा रहिवासी होता. त्याला पबजी खेळण्याचा नाद होता. मात्र त्याच्या फोनमधील रिचार्ज संपला. त्याने आईकडे त्यासाठी पैसे मागितले पण आईने नकार दिला. त्यामुळेच नीरजने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आई घराबाहेर गेल्यावर त्याने आत्महत्या केली. घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

नीरजच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पबजी खेळण्यासाठी नीरजला 3 महिन्यांचा डेटा पॅक रिचार्ज करायचा होता. तो त्यासाठी हट्ट करत होता. त्यावेळी आईनं त्याला एका महिन्याचं कर असं सांगितल्यानंतर दोघांमध्ये खूप वाद झाला. नीरजने काहीही न ऐकून घेता वाद घालायला सुरुवात केली. तसेच नीरज एवढं टोकाचं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं अशी माहिती आईने पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये गावकऱ्यांनी काढली गायीची अंत्ययात्रा अन् नंतर झालं असं काही...

CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्... 

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : धोका वाढला! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये मैत्रिणीला लपून-छपून भेटणं भाजपा नेत्याला चांगलंच पडलं महागात

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरण

 

Web Title: bhopal youth commits suicide in bagsevania for internet recharge SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.