bhopal lok sabha elections 2019 bjp demands to convene assembly session | कमलनाथ सरकार अल्पमतात, राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवावं, भाजपाचा दावा
कमलनाथ सरकार अल्पमतात, राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवावं, भाजपाचा दावा

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2019च्या प्रचाराचा धुरळा शांत झाला असतानाच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. 23 मे रोजी येणाऱ्या निकालाआधीच या एक्झिट पोलमधून मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याच दरम्यान मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला जात आहे. भाजपा नेते गोपाल भार्गव यांनी राज्यपालांना चिठ्ठी लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
 
गोपाल भार्गव म्हणाले, ज्या प्रकारे केंद्र आणि राज्यात भाजपाला जबरदस्त जनाधार मिळालेला आहे. तसेच काँग्रेसचे अनेक आमदार कमलनाथ सरकारला वैतागलेले आहेत. त्यांना भाजपामध्ये प्रवेश हवा आहे. भाजपा काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु काँग्रेसच्या त्या आमदारांना कमलनाथ सरकारबरोबर काम करायचं नाही. त्यामुळे राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवावं, कारण जनता आता पूर्णतः नाकारत आहे. हे सरकार आपल्या कर्मानं जाणार असल्याचंही भार्गव म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट करत 2004 मध्ये एक्झिट पोल दाखविले होते. 2018 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निकालांचे एक्झिट पोल दाखविले होते. त्यात काँग्रेसचा पराभव होईल सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात निकाल उलट लागले होते. त्यामुळे 23 मे पर्यंत वाट पाहावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रत्यक्ष निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होईल आणि भाजपाच्या आश्वासनाचा बुरखा फाटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: bhopal lok sabha elections 2019 bjp demands to convene assembly session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.