उत्तर प्रदेशात निवडणूक लढविण्याची भीम आर्मीची तयारी; 15 मार्चला करणार पक्षाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 10:26 AM2020-03-02T10:26:52+5:302020-03-02T10:27:53+5:30

सध्या तरी आपण भीम आर्मीचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले.

Bhim Army ready to contest elections in Uttar Pradesh; Party announcement on March 15 | उत्तर प्रदेशात निवडणूक लढविण्याची भीम आर्मीची तयारी; 15 मार्चला करणार पक्षाची घोषणा

उत्तर प्रदेशात निवडणूक लढविण्याची भीम आर्मीची तयारी; 15 मार्चला करणार पक्षाची घोषणा

googlenewsNext

नवी दिल्ली - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद येत्या 15 मार्च रोजी नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. पक्ष स्थापनेची घोषणा कुठे करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र 2022 मध्ये उत्तर प्रदेशात होणारी विधानसभा निवडणूक लढविण्याचा तयारी भीम आर्मीने सुरू केली आहे.

चंद्रशेखर रविवारी लखनौ येथे आले होते. यावेळी त्यांनी नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी केली होती. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी त्यांनी एनआरसी आणि सीएएविरुद्धच्या आंदोलनात भीम आर्मीची भूमिका महत्त्वपूर्ण राहिल असं म्हटले आहे. तसेच एससी आणि एसटी वर्गाच्या प्रगतीसाठी आपण काम करणार असल्याचे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे पोलीस अधिकारी चिरंजीव नाथ यांनी म्हटले की, भीम आर्मीच्या चंद्रशेखर आजाद यांना ताब्यात घेण्यात आले नाही. व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये ते दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तिथे दाखल झाली होते. 

दरम्यान चंद्रशेखर लखनौमध्ये दाखल झाले असताना बहुजन समाज पक्षाचे तीन नेते उपस्थित होते. बसपाचे लखनौ माजी जिल्हा अध्यक्ष रामलखन चौरसिया, इजहारुख हक आणि अशोक कुमार चौधरी यांनी भीम आर्मीचे सदस्यत्व घेतले आहे. सध्या तरी आपण भीम आर्मीचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Bhim Army ready to contest elections in Uttar Pradesh; Party announcement on March 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.