Bharat Vehicle Series: तुमच्या गाडीला कसा मिळेल भारत सिरीजचा नंबर, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, असा मिळेल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 12:30 PM2021-08-29T12:30:50+5:302021-08-29T12:30:59+5:30

Bharat Vehicle Series: ही सिरीज लागू झाल्यानंतर केंद्रीय, पीएसयू, राज्य सरकार आणि खासगी संस्था ज्यांची चार राज्यांमध्ये कार्यालये आहेत. या सर्वांचे कर्मचारी जर अन्य राज्यांत गेलेतर त्यांना त्यांच्या वाहनाची पुन्हा नोंद करावी लागणार नाही.

Bharat Vehicle Series: How to get your car Bharat Series number, know how to apply, how to get the benefit | Bharat Vehicle Series: तुमच्या गाडीला कसा मिळेल भारत सिरीजचा नंबर, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, असा मिळेल फायदा

Bharat Vehicle Series: तुमच्या गाडीला कसा मिळेल भारत सिरीजचा नंबर, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, असा मिळेल फायदा

Next

नवी दिल्ली - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २८ ऑगस्ट रोजी  Bharat Series Vehicle Number चे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ही सिरीज लागू झाल्यानंतर केंद्रीय, पीएसयू, राज्य सरकार आणि खासगी संस्था ज्यांची चार राज्यांमध्ये कार्यालये आहेत. या सर्वांचे कर्मचारी जर अन्य राज्यांत गेलेतर त्यांना त्यांच्या वाहनाची पुन्हा नोंद करावी लागणार नाही. (Bharat Vehicle Series)आज आपण जाणून घेऊयात की, Bharat Series Vehicle Number साठी कशाप्रकारे अर्ज करता येईल याबाबत.  

पहिली पायरी - भारत सिरीजच्या नंबरसाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Parent State कडून NOC घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला दुसरे राज्य Bharat Vehicle Series चा नंबर उपलब्ध करून देईल. 
दुसरी पायरी - नव्या राज्यामध्ये प्रो-डेटा बेसवर रोड टॅक्स द्यावा लागेल.  त्यानंतर नवे राज्य तुम्हाला Bharat Vehicle Series देईल.  
तिसरी पायरी - तिसरी बाब म्हणजे मूळ राज्यामध्ये रोड टॅक्स परत देण्यासाठी अर्ज दाखल करावा लागेल. मूळ राज्याकडून पैसे परत मिळवणे ही एक किचकट प्रक्रिया आहे.

Bharat Vehicle Series ची रचना - BH नोंदणीची रचना YY BH 5529 XX YY अशी ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये आधी नोंदणीचे वर्ष BH - भारत सिरीज कोड ४-०००० पासून ९९९९ XX अल्फाबेट्स (AA ते ZZ पर्यंत)

MORTH मे अधिसूचनेमध्ये सांगितली ही गोष्ट - बीएच सिरीजअंतर्गत मोटर व्हेईकल टॅक्स दोन वर्षे किंवा ४, ६, ८ या हिशेबाने आकारला जातो. ही योजना नव्या राज्यात स्थलांतरीत झाल्यावर खासगी वाहनांना मोफत ये जा करण्यासी सुविधा प्रदान करेल. चौदाव्या वर्षानंतर मोटार व्हेईकल टॅक्स वार्षिक पद्धतीने आकारला जाईल. तो या वाहनासाठी आधी वसूल करण्यात आलेल्या रकमेच्या अर्धा असेल.  

Web Title: Bharat Vehicle Series: How to get your car Bharat Series number, know how to apply, how to get the benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.