रेल्वेमध्ये नोकरीची उत्तम संधी, परीक्षेशिवाय होणार निवड, असा करा अर्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 04:01 PM2020-06-29T16:01:29+5:302020-06-29T16:28:12+5:30

ईस्टर्न रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेल(आरआरसी) ने ट्रेड अप्रँटिसच्या या पदांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

The best job opportunity in railways, the selection will be done without examination, apply | रेल्वेमध्ये नोकरीची उत्तम संधी, परीक्षेशिवाय होणार निवड, असा करा अर्ज  

रेल्वेमध्ये नोकरीची उत्तम संधी, परीक्षेशिवाय होणार निवड, असा करा अर्ज  

googlenewsNext
ठळक मुद्देभरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला दहावीत किमान ५० टक्के गुण मिळालेले असणे आवश्यकउमेदवाराकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक ईस्टर्न रेल्वे अॅप्रँटिस रिक्रूटमेंट २०२० अंतर्गत भरतीसाठी लेखी परीक्षा होणार नाही. तर थेट भरती केली जाईल

मुंबई - रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या दोन हजार ७९२  पदांसाठी भरती निघाली असून, या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. वाढवण्यात आलेल्या मुदतीनुसार पात्र आणि इच्छुक व्यक्ती ९ जुलै २०२० पर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकतील. सुरुवातीला या भरतीसाठी ५ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे ही निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आता ईस्टर्न रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेल(आरआरसी) ने ट्रेड अप्रँटिसच्या या पदांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी १५ ते २४ अशी वयोमर्यादा आहे. मात्र एससी/एसटीसह अन्य प्रवर्गातील उमेदवारांना भरतीसाठी १० वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला दहावीत किमान ५० टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. तसेच दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच अर्जदार उमेदवाराकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला वर्गासाठी कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. प्रवेश शुल्काचा भरणा क्रेडिट, डेबिट कार्ड, एसबीआय, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने करता येईल.  

 ईस्टर्न रेल्वे अॅप्रँटिस रिक्रूटमेंट २०२० अंतर्गत भरतीसाठी लेखी परीक्षा होणार नाही. तर थेट भरती केली जाईल. त्यासाठी उमेदवारांना दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण, आयटीआयमध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरून क्रमवारी तयार केली जाईल. त्यानंतर या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जेव्हा जेव्हा अडचणीत आले मोदी सरकार, मदतीला धावून गेले शरद पवार; या घटना आहेत साक्षीदार

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

चीनविरोधात सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू, या ठिकाणांवरून परिस्थितीवर ठेवलीय नजर

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

Web Title: The best job opportunity in railways, the selection will be done without examination, apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.