पोलीस ठाण्यात मारहाण झाली, शिक्षिकेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:02 AM2020-07-06T03:02:26+5:302020-07-06T03:03:00+5:30

माझ्या भावाचा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला असून, त्याबाबत मी केलेली तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दडपण आणले, असे त्यांचे म्हणणे आहे.

Beaten at police station, teacher accused | पोलीस ठाण्यात मारहाण झाली, शिक्षिकेचा आरोप

पोलीस ठाण्यात मारहाण झाली, शिक्षिकेचा आरोप

Next

तुतिकोरीन (तामिळनाडू) : शिक्षिका एम. शांती यांनी पोलीस उपअधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत मला पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. माझ्या भावाचा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला असून, त्याबाबत मी केलेली तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दडपण आणले, असे त्यांचे म्हणणे आहे.
या शिक्षिकेचा भाऊ तामिळनाडू वीज मंडळात नोकरीला होता. त्याचा २२ फेब्रुवारी रोजी तो कामावर निघाला असताना संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी मात्र त्याचा मृत्यू अपघाती म्हणून नोंदवला आहे. पोलिसांनी तुमच्या भावाला मारहाण केली होती, असे स्थानिक लोकांनी मला सांगितले होते, असा शांती यांचा दावा आहे. मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केलेला होता, असे त्या म्हणाल्या. तुम्ही केलेली तक्रार मागे घ्या, असे म्हणून पोलिसांनी मला ठाण्यात मारहाण केली, असा त्यांचा आरोप आहे.

Web Title: Beaten at police station, teacher accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.