'अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्स अन् वेबसाईटवर बंदी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 02:11 PM2022-01-20T14:11:29+5:302022-01-20T14:15:54+5:30

अफवा पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याची घोषणा अनुराग ठाकूर यांनी केली आहे

'Ban on YouTube Channels and Websites Spreading Rumors, False Information', Anurag thakur | 'अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्स अन् वेबसाईटवर बंदी'

'अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्स अन् वेबसाईटवर बंदी'

Next

नवी दिल्ली - सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रचार आणि अफवा पसरविण्याचं काम मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. त्यामुळेच, एखाद्या घटनेची किंवा माहितीची सत्यता पडताळण्यासाठी अनेकांना कसरत करावी लागते. तसेच, अधिकृत मीडिया वेबसाईटसनेच दिलेल्या वृत्तांकनाकडे सत्य म्हणून पाहिले जाते. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात फेकन्यूज आणि अफवा पसरवणाऱ्या वेबसाईट तयार केल्या जातात. तर, भारताला बदनाम करण्याचे कारस्थान ठेवूनही काही वेबसाईट काम करतात. आता, या वेबसाईटवर बंदी घालणार असल्याचं माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय. 

अफवा पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याची घोषणा अनुराग ठाकूर यांनी केली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती. आता या निर्णयानंतर केंद्र सरकार अशा वेबसाइट्स आणि युट्यूबवर चॅनेल्सवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिलाय. खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मला आनंद आहे की जगभरातील मोठ्या देशांनी याची दखल घेतली आहे. यु ट्यूबने देखील समोर येत असे युट्यूब चॅनल्स ब्लॉक केले आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले. 

ते युट्यूब चॅनेल्स पाकिस्तानातून चालवे जात

गुप्तचर संस्थांशी समन्वय करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतविरोधी आणि खोटी माहिती पसरवण्याचा ठपका ठेवत डिसेंबर २०२१ मध्ये २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती. यातून समाजात फूट पाडणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर भविष्यात देखील कारवाई सुरूच राहिल, असे नुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. बंदी घातलेले यु-ट्यूब चॅनल्स आणि वेबसाइट्स पाकिस्तानमधून चालवले जात होते. ते भारतासंबंधी संवेदनशील विषयांवर खोटी माहिती पसरवत होते. या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर काश्मीर, भारतीय सैन्य, भारतातील अल्पसंख्याक समुह, राम मंदीर, जनरल बिपीन रावत इत्यादी विषयांवर विभाजनकारी माहिती पसरवली जात होती.”
 

Web Title: 'Ban on YouTube Channels and Websites Spreading Rumors, False Information', Anurag thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.