बबिता फोगट झाली आई, फोटो शेअर करत म्हणाली मीट अवर लिटिल 'सन'शाईन

By जयदीप दाभोळकर | Published: January 11, 2021 06:23 PM2021-01-11T18:23:16+5:302021-01-11T18:25:19+5:30

फोटो शेअर करत दिली माहिती, पाहा चिमुकल्या पाहुण्याचा फोटो

Babita Phogat And Vivek Suhag Blessed With Baby Boy Wrestler Shares Pictures on social media twitter | बबिता फोगट झाली आई, फोटो शेअर करत म्हणाली मीट अवर लिटिल 'सन'शाईन

बबिता फोगट झाली आई, फोटो शेअर करत म्हणाली मीट अवर लिटिल 'सन'शाईन

googlenewsNext
ठळक मुद्देफोटो शेअर करत बबितानं दिली माहितीयापूर्वी विरुष्काच्या घरीही झालं चिमुकलीचं आगमन

भारताची महिला स्टार रेसलर बबिता फोगटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. बबिता फोगटनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर तिनं स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गोड बातमी सर्वांना दिली. यापूर्वी सोमवारी दुपारी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरीही चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. विराट कोहलीनंसोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली होती. 

बबित फोगटनं आपल्या पतीसह मुलाचा फोटो शेअर केला आहे. "आमच्या  SONshine ला भेटा. स्वप्नांवर विश्वास ठेवा. ती पूर्ण होतात. आमची स्वप्न या निळ्या कपड्यांमध्ये असलेल्यामुळे पूर्ण झाली," असा भावूक संदेशही तिनं आपल्या फोटोसोबत लिहिला आहे. २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बबिता फोगटनं डिसेंबर २०१८ मध्ये विवेक सुहाग याच्यासह विवाह केला होता. 



त्यानंतर तिनं २१ नोव्हेंबर रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला होता. यासोबतच तिनं आपण आपल्या जिवनाचा नवा अध्याय सुरू करण्यास उत्साहित असल्याचं आणि आतुर असल्याचंही म्हटलं होतं. तिचा पती विवेकदेखील एक रेसलरच आहे. त्यांची भेट २०१४ मध्ये झाली होती. 

विरुष्काही झाले आई-बाबा

आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला हे सांगताना आम्हाला दोघांनाही खुप आनंद होत आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी या दोघींचीही प्रकृती उत्तम आहे. आता आम्हाला थोडा एकांत हवा असेल हे तुन्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो, असं विराटनं पोस्ट शेअर करत म्हटलं होतं. 

Web Title: Babita Phogat And Vivek Suhag Blessed With Baby Boy Wrestler Shares Pictures on social media twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.