ही केवळ अफवा, योगपीठातील कोणताही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही; बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 10:00 PM2021-04-23T22:00:23+5:302021-04-23T22:01:46+5:30

Coronavirus : पतंजलीतील ८३ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त आलं होतं समोर

baba ramdev on corona infection in pantjali said no staff member is covid positive this is rumor | ही केवळ अफवा, योगपीठातील कोणताही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही; बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण

ही केवळ अफवा, योगपीठातील कोणताही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही; बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देपतंजलीतील ८३ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त आलं होतं समोरअफवा असल्याचं बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठातील ८३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु बाबा रामदेव यांनी हे वृत्त फेटाळलं असून ती केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. "बाहेरून आलेले काही लोकं अॅडमिशनपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले होते. पतंजलीतील कोणताही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. 

"पतंजलीत कोणताही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही. IPD मध्ये नवे रुग्ण आणि आचार्यकुलममध्ये काही विद्यार्थी प्रवेशासाठी आले होते. आम्ही कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांअंतर्गत त्यांची कोरोना चाचणी केली. त्यातील १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांना आम्ही मुख्य परिसरात प्रवेशाची परवानगी दिली नाही," असं बाबा रामदेव म्हणाले.

पतंजली योगपीठातील ८३ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याच्या वृत्तावर बोलताना त्यांनी या अफवा आणि खोटं वृत्त असल्याचं म्हटलं. याशिवाय आपण दररोज ५ ते १० वाजेपर्यंत योग आणि आरोग्यासंबंधी लाईव्ह प्रोग्राम करत असल्याचे ते म्हणाले. "पतंजलीत कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या निव्वळ अफवा आहेत. या ठिकाणी अॅडमिशनसाठी जे लोकं आलेले त्यातील काही जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी अनेक जण आता आपापल्या घरीही गेले आहेत. आम्ही आमच्या इकडे कोविड सेंटर्स उभारली आहे. चाचण्यांशिवाय आम्ही कोणालाही प्रवेश देत नाही," असंही त्यांनी नमूद केलं. 
 

Web Title: baba ramdev on corona infection in pantjali said no staff member is covid positive this is rumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.