‘आयुर्वेदिक’ने रुग्ण पूर्णपणे बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:12 AM2020-08-01T05:12:09+5:302020-08-01T05:12:18+5:30

दिल्लीच्या संस्थेत उपचार : एकही जण दगावला नाही

‘Ayurvedic’ completely cures the patient | ‘आयुर्वेदिक’ने रुग्ण पूर्णपणे बरे

‘आयुर्वेदिक’ने रुग्ण पूर्णपणे बरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्ली येथील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेद (एआयआयए) या संस्थेच्या रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी अनेक जण पूर्णपणे बरे झाले आहेत. या संस्थेतील एकही कोरोना रुग्ण दगावल्याची घटना घडलेली नाही, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.
आयुष मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, एआयआयएमध्ये संपूर्ण आयुर्वेदिक उपचार करण्यात आलेल्या रुग्णांना औषधे देण्याबरोबरच उपचारांमध्ये संतुलित आहार व योगासनांची जोड देण्यात आली. त्यामुळे कोरोनाचे अनेक रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना कोरोना संसगार्मुळे अन्य कोणतीही व्याधी जडली नसल्याचे दिसून आले आहे. या संस्थेच्या रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावलेला नाही.
आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सरिता विहार येथील एआयआयएच्या कोरोना उपचार केंद्राला नुकतीच भेट दिली. तिथे उपचारांच्या सोयीची त्यांनी पाहणी केली. ते म्हणाले, प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्याची मोठी क्षमता आहे.

सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला
आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले की, एआयआयएने कोरोना रुग्णांना पूर्णपणे बरे करून एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. एआयआयएच्या कोरोना उपचार केंद्रांमधून बरे होऊन घरी गेलेल्या सर्व रुग्णांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. त्याचा त्यांना आयुष्यातील इतर प्रसंगांच्या वेळीही चांगला उपयोग होईल.

Web Title: ‘Ayurvedic’ completely cures the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.