ATM Card Tokenization: आरबीआयने तो निर्णय 6 महिने पुढे ढकलला; 1 जानेवारीपासून होणार होता लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 09:47 PM2021-12-23T21:47:26+5:302021-12-23T21:49:30+5:30

Card Tokenisation RBI Postpone: भारतात, टोकनायझेशन संकल्पना आधीच युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) मध्ये वापरली जाते. यामुळे, ही सर्वात सुरक्षित पेमेंट प्रणालींपैकी एक आहे.

ATM Debit, credit Card Tokenisation: RBI postpones decision for 6 months; Implemented from January 1 | ATM Card Tokenization: आरबीआयने तो निर्णय 6 महिने पुढे ढकलला; 1 जानेवारीपासून होणार होता लागू

ATM Card Tokenization: आरबीआयने तो निर्णय 6 महिने पुढे ढकलला; 1 जानेवारीपासून होणार होता लागू

googlenewsNext

डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित बनविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कार्ड टोकनाझेशनचा मोठा निर्णय घेतला होता. आरबीआय हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू करणार होती. मात्र, आता हा निर्णय सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा निर्णय 30 जूननंतर लागू केली जाणार आहे. 

RBI द्वारे ATM/डेबिट/क्रेडिट कार्ड सुरक्षित करण्यासाठी, ही व्यवस्था करण्यात आली होती. कोणतीही कंपनी किंवा व्यापारी कार्ड क्रमांक, एक्सपायरी डेट किंवा CVV सारखी ग्राहकाच्या डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती साठवू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटोसह सर्व कंपन्यांना ग्राहकांचा सेव्ह केलेला डेटा आधीच डिलीट करण्यास सांगितले आहे. जेणेकरून ऑनलाइन व्यवहारांची सुरक्षा वाढवता येईल. त्याच वेळी, रिझर्व्ह बँकेने Visa, Mastercard आणि Rupay ला कार्ड जारी करणाऱ्या बँक किंवा कंपनीच्यावतीने टोकन जारी करण्याची परवानगी दिली आहे, ज्याला टोकनायझेशन म्हटले जात आहे.


अशाप्रकारे, ग्राहकांच्या कार्डचे तपशील व्यापाऱ्यांकडे साठवले जाणार नाहीत, ज्यामुळे डेटा चोरी आणि फसवणुकीच्या घटना टाळता येतील. कार्ड टोकनायझेशन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे कार्ड माहिती कोड किंवा टोकनने बदलली जाईल. याद्वारे आवश्यक माहिती उघड न करता व्यवहारांना परवानगी दिली जाईल.

भारतात, टोकनायझेशन संकल्पना आधीच युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) मध्ये वापरली जाते. यामुळे, ही सर्वात सुरक्षित पेमेंट प्रणालींपैकी एक आहे.

Web Title: ATM Debit, credit Card Tokenisation: RBI postpones decision for 6 months; Implemented from January 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.