Assembly Elections 2026: 2026 हे वर्ष देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पश्चिम बंगाल, असम, पुडुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने रणनिती आखण्याचे काम वेगाने सुरू केले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शह स्वतः मोर्चा सांभाळत आहेत.
प्रत्येक महिन्यात दक्षिण आणि पूर्व भारतात दौरे
डिसेंबरच्या अखेरीस अमित शाहपश्चिम बंगालचा दौरा करतील. तर, जानेवारी 2025 पासून ते प्रत्येक महिन्यात दोन दिवस पश्चिम बंगाल, असम, तामिळनाडू आणि केरळमध्ये राहून संघटनात्मक बैठका, बूथ स्तरावरील तयारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. आचारसंहितेपर्यंत हे सर्व दौरे सुरू राहणार आहेत. शाह सहयोगी पक्षांशीही चर्चा करतील.
बंगाल: भाजपची सविस्तर रणनिती
बंगालमध्ये 2021 नंतर भाजपने संघटन मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाच्या नव्या संघटनात्मक आराखड्यानुसार, भूपेंद्र यादव यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती, विप्लव देव सहप्रभारी आणि सहा राज्यांतील संघटन मंत्र्यांना बंगालमधील पाच मोठ्या विभागांमध्ये नियुक्ती, तसेच सहा वरिष्ठ नेते पुढील पाच महिने बंगालमध्ये कायम मुक्काम करणार आहेत.
क्षेत्रनिहाय जबाबदाऱ्या
पवन साईं (छत्तीसगड) – राढ बंगाल
त्यांना मदत: धनसिंह रावत (उत्तराखंड मंत्री)
उद्दिष्ट: पुरुलिया–वर्धमानसारख्या भागांत संघटना बळकट करणे
पवन राणा (दिल्ली संघटन मंत्री) – हावडा, हुगळी, मेदिनीपूर
हावडा–हुगळीमध्ये त्यांच्यासोबत संजय भाटिया (हरियाणा)
मेदिनीपूर विभागात जेपीएस राठौर (यूपी सरकार मंत्री)
तामिळनाडूसाठी विशेष नियुक्त्या
तामिळनाडूमध्ये भाजप ऐतिहासिकरीत्या कमजोर मानली जाते, परंतु यावेळी पक्षाने मोठी तयारी दाखवली आहे.
विजयकुमार जय पांडा – निवडणूक प्रभारी
मुरलीधर मोहोल – सहप्रभारी
दक्षिण भारतात पक्षाची उपस्थिती वाढवण्यासाठी ही टीम मैदानात काम करणार आहे.