Assembly Election: सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनमत, तरीही मतदारांसमोर नाही स्पष्ट पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:28 AM2022-01-21T06:28:48+5:302022-01-21T06:29:03+5:30

गोवा, पंजाब आणि उत्तराखंड या तुलनेने लहान राज्यांत आश्चर्यकारक निकालाची चर्चा अराजकीय वर्तुळात सुरूही झाली आहे. 

Assembly Election referendum against the ruling party but no clear option for voters | Assembly Election: सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनमत, तरीही मतदारांसमोर नाही स्पष्ट पर्याय

Assembly Election: सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनमत, तरीही मतदारांसमोर नाही स्पष्ट पर्याय

Next

- व्यंकटेश केसरी 

नवी दिल्ली : पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्येही बहुरंगी लढती आणि सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत असले तरी मतदारांना स्पष्ट पर्याय उपलब्ध नाही. गोवा, पंजाब आणि उत्तराखंड या तुलनेने लहान राज्यांत आश्चर्यकारक निकालाची चर्चा अराजकीय वर्तुळात सुरूही झाली 
आहे. 

राजकीय खेळाडू हे या राज्यांत पक्ष सोडून जाणाऱ्यांना प्रोत्साहन देत असल्यामुळे त्यातून त्यांचे पक्ष ही निवडणूक कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांवर विसंबून जिंकू शकत नाही हेच मान्य करीत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस ३० टक्के अनुसूचित जातींची मते व दलित मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर विसंबून राहणार असेल, तर हिंदू आणि शीख मतदार दुखावले जाणार आहेत. आम आदमी पक्षाकडे (आप) निष्ठावंत कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे किसान फ्रंट ‘आप’च्या मतांत फूट पाडू शकेल. 

काँग्रेस पक्षाच्या आमदारांची निवड ही पक्षनिष्ठा आणि गट समित्यांनी केलेल्या शिफारशींवरून केलेली असल्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत अशा आत्मविश्वास ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसच्या आमदारांना फोडल्यानंतर तृणमूल काँग्रेस आता निवडणुकीच्या आधी युतीसाठी आग्रही आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून स्पष्ट प्रस्ताव आलेला नाही, असे चिदंबरम म्हणाले. गोवा काँग्रेस अशा युतीविरोधात आहे. कारण पंजाब आणि उत्तराखंडमध्ये ‘आप’ काँग्रेसविरोधात लढत आहे. 

तिसऱ्यांदा भाजप?
भाजपविरोधातील पक्षांत होणारी मतविभागणी भाजपला तिसऱ्यांदा सत्ता देऊ शकेल का? भाजपदेखील बळकट नाही हे विशेष. उत्तराखंड अस्तित्वात आल्यापासून दिवंगत एन. डी. तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला ५ वर्षे पूर्ण करता आलेले नाहीत. भाजप उत्तर प्रदेशातील निवडणूक ही रामराज्य विरुद्ध गुंडा राज असल्याचे सांगत आहे.

मित्रपक्ष बनले भाजपला ताप
पाटणा : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राजकीय स्थान मिळवण्यासाठी भाजपच्या सहयोगी पक्षांतील अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. जनता दल (संयुक्त), विकासशील इन्सान पार्टीने (व्हीआयपी)  उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय जनता दलानेही (राजद) उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलला आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) घटक पक्ष उत्तर प्रदेशमध्ये एक-दुसऱ्यापासून वेगवेगळ्या मार्गांवर दिसत आहेत. 
बिहारमध्ये रालोआच्या भाजप व जदयू या दोन महत्त्वाच्या घटक पक्षांतील बोलणी अजून संपलेली नाही, तरीही दोघांमधील दबावाचे राजकारण कमी झालेले दिसत नाही. 
मुकेश सहनी यांचा व्हीआयपी तर उघडपणे भाजपविरोधात आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चादेखील (हम) स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये जनता दलाने (संयुक्त) ५१ जागा लढवण्याचे ठरवले आहे. जदयूने ही इच्छा भाजपला आधीच सांगितली होती; परंतु अजून दोन्ही पक्षांत काही सूत्र ठरलेले नाही.
जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह म्हणाले की, जर भाजपने समझोत्याचा निर्णय लवकर नाही घेतला, तर जदयूचे उत्तर प्रदेश अध्यक्ष उमेदवारांची यादी जाहीर करतील. तसे झाले तर याचा परिणाम बिहारमध्ये होऊ शकतो व बिहारमधील राजकारण वेगळे वळण घेईल.

उत्तर प्रदेश- अधिकाऱ्यावर आरोप
गोंडाचे जिल्हादंडाधिकारी मार्कंडेय साहनी हे भाजपच्या हिताचे काम करीत असल्याचा आरोप निवडणूक आयोगाकडे समाजवादी पक्षाने गुरुवारी केला.
 

Web Title: Assembly Election referendum against the ruling party but no clear option for voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.