NRC ची अंमलबजावणी, ३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत; आसामसाठी भाजपचे संकल्पपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 12:27 PM2021-03-23T12:27:49+5:302021-03-23T12:31:06+5:30

Assam Assembly Election 2021: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्पपत्र जाहीर केले आहे.

assam assembly election 2021 bjp leader jp nadda release manifesto free education caa nrc brahmaputra | NRC ची अंमलबजावणी, ३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत; आसामसाठी भाजपचे संकल्पपत्र

NRC ची अंमलबजावणी, ३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत; आसामसाठी भाजपचे संकल्पपत्र

Next
ठळक मुद्देआसाम विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीरNRC ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासनस्वामी विवेकानंद यांच्या नावाने नवीन योजना आखून स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार

गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीच्या (Assam Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, भाजपचे मंत्री, नेते विविध ठिकाणी जनतेला संबोधित करत आहेत. आसाममधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्पपत्र जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यांनी निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. आसाममध्ये योग्य पद्धतीने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (NRC) ची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. (assam assembly election 2021 bjp leader jp nadda release manifesto free education caa nrc brahmaputra)

जेपी नड्डा यांनी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र जाहीर करताना पुन्हा एकदा NRC च्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे. यासह विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, CAA, ३० लाख कुटुंबीयांना आर्थिक मदत अशा मोठ्या आश्वासनांचा यात समावेश आहे. 

मिशन ब्रह्मपुत्र, मोफत शिक्षण

आसाममध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यास सरकारी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल. तसेच आठवीनंतर विद्यार्थ्यांना सायकल दिली जाईल. मिशन ब्रह्मपुत्र अंतर्गत महापूर रोखण्यासाठी विशेष योजना आखली जाईल, जेणेकरून आसामवासीयांना महापुराची समस्या भेडसावणार नाही, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. 

महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण, CAA लागू होणार; प. बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर

३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत

स्वामी विवेकानंद यांच्या नावाने नवीन योजना आखून स्टार्टअपसाठी प्रोत्साहन दिले जाईल. अरुणोदय योजनेंतर्गत ३० लाख कुटुंबांना प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये देण्यात येतील. तसेच अडीच लाखांचीही मदत करण्यात येणार आहे. अवैध बांधकामे हटवण्यात येतील. आसाममधील परिसीमन प्रक्रियेची व्याप्ती वाढवली जाईल. सर्वांना जमिनीचा मालकी हक्क दिला जाईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. 

NRC आणि आत्मनिर्भर आसाम

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे योग्य पद्धतीने NRC ची अंमलबजावणी आसाममध्ये केली जाईल. घुसखोरांची ओळख पटवली जाईल. आत्मनिर्भर आसाम अभियान राबवले जाईल. प्रत्येक क्षेत्राला मदत आणि प्रोत्साहन दिले जाईल. सरकारी क्षेत्रात २ लाख रोजगार आणि ३० मार्च २०२२ पर्यंत एक लाख नोकऱ्या दिल्या जातील. तसेच खासगी क्षेत्रात ८ लाख रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन भाजपने आपल्या संकल्पपत्रातून दिले आहे. 

भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी; टीएमसीची टीका

दरम्यान, सर्वानंद सोनोवाल आणि हेमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली गेली ५ वर्षे भाजपचे सरकार आसाममध्ये आहे. भाजपकडून सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसकडूनही जोरात प्रचार केला जात आहे. आसाम विधानसभेच्या १२६ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७२ मार्चला, तर दुसऱ्या टप्प्यात ३९ जागांसाठी १ एप्रिलला आणि तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६ एप्रिलला मतदान होणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
 

Web Title: assam assembly election 2021 bjp leader jp nadda release manifesto free education caa nrc brahmaputra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.