Arun Jaitley Death Update : अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 01:44 PM2019-08-24T13:44:49+5:302019-08-25T15:18:42+5:30

नवी दिल्ली - नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थ मंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते ...

Arun Jaitley Death Update: I lost a close friend, Narendra Modi's emotional tweet after Jaitley's death | Arun Jaitley Death Update : अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Arun Jaitley Death Update : अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next

नवी दिल्ली - नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

एम्स रुग्णालयाने पत्रक जारी करत अरुण जेटलींच्या निधनाची माहिती दिली. शनिवारी दुपारी 12.07 वाजता जेटलींनी अखेरचा श्वास घेतल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. जेटलींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, सोशल मीडियातूनही त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त होत आहे. देशाची मोठी हानी झाल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. 


 

LIVE

Get Latest Updates

02:26 PM

अरुण जेटलींचे पार्थिव निगमबोध घाटावर दाखल

02:00 PM

भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात

02:00 PM

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, पीयूष गोयल यांनी घेतले अरुण जेटली यांचे अंत्यदर्शन

12:48 PM

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतले अरुण जेटलींचे अंत्यदर्शन

12:35 PM

भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी 2.30 वाजता होणार अंत्यसंस्कार

 भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी 2.30 वाजता होणार अंत्यसंस्कार 

11:26 AM

अरुण जेटली यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात दाखल

10:43 AM

अरुण जेटली यांचे पार्थिव भाजपा कार्यालयाच्या दिशेन रवाना

10:43 AM

ब्रिटिश उच्चायुक्त डॉमिनिक असेक्विथ यांनी अरुण जेटली यांना वाहिली श्रद्धांजली

09:43 AM

ब्रिटिश उच्चायुक्त डॉमिनिक असेक्विथ यांनी अरुण जेटली यांना वाहिली श्रद्धांजली

09:21 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली

08:36 PM

जेटलींच्या जाण्यानं न भरून निघणार हानी झाली आहे- अमित शाह

08:34 PM

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली

04:33 PM

राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली, 'संसदेतील चर्चेत जिवंतपणा आणत होेते जेटली'

04:30 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्याकडूनही शोक व्यक्त

04:28 PM

अरुण जेटलींच्या निधनाने मला अतिव वेदना, राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

03:51 PM

अरुण जेटली देशातील एक द्रष्टे मुत्सद्दी, कायदेतज्ञ, प्रतिभासंपन्न संसदपटू

अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “अरुण जेटली देशातील एक द्रष्टे मुत्सद्दी, कायदेतज्ञ, प्रतिभासंपन्न संसदपटू तसेच उत्कृष्ट केंद्रीय मंत्री होते. अमोघ वक्तृत्वकला लाभलेले जेटली राष्ट्राकरिता अनमोल रत्न होते, अशी प्रतिक्रिया राव यांनी दिली आहे.

03:28 PM

माझं दु:ख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, वैंकय्या नायडू भावुक

03:27 PM

जनसामान्यांसाठी जेटलींचं योगदान अविस्मरणीय - सोनिया गांधी

03:25 PM

जेटलींचं निधन ही माझी वैयक्तिक हानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावुक

02:46 PM

नम्रता आणि विद्वत्ता म्हणजे जेटली होय, चंद्रकांत पाटील यांच्याकडून शोक व्यक्त

02:11 PM

सुषमाजी अन् जेटलींच जाण हे वज्राघात, नितीन गडकरींकडून श्रद्धांजली

01:48 PM

मी अत्यंत जवळचा मित्र गमावला, मोदींकडून भावुक श्रद्धांजली

Web Title: Arun Jaitley Death Update: I lost a close friend, Narendra Modi's emotional tweet after Jaitley's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.