Arun Jaitley Death: 'मोदींना राष्ट्रीय राजकारणात आणणारा नेता हरपला, एनडीएचा आधार गेला!'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 12:58 PM2019-08-24T12:58:30+5:302019-08-24T13:32:32+5:30

''नरेंद्र मोदींना दिल्लीचा मार्ग दाखवणारे अरुण जेटली आहेत.

Arun jaitaly passed away, bringing narendra Modi into national politics!' says Sanjay raut | Arun Jaitley Death: 'मोदींना राष्ट्रीय राजकारणात आणणारा नेता हरपला, एनडीएचा आधार गेला!'

Arun Jaitley Death: 'मोदींना राष्ट्रीय राजकारणात आणणारा नेता हरपला, एनडीएचा आधार गेला!'

Next
ठळक मुद्दे''नरेंद्र मोदींना दिल्लीचा मार्ग दाखवणारे अरुण जेटली आहेत. अरुण जेटली जितके विद्वान होते, तितकेच नम्र होते. विद्यार्थी दशेपासून त्यांनी भाजपाची जबाबदारी स्विकारली होती.

नवी दिल्ली - नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनानंतर देशातील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माझा मोठा भाऊ गेला, अशा शब्दात जेटलींच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ''नरेंद्र मोदींना दिल्लीचा मार्ग दाखवणारे अरुण जेटली आहेत. मोदींसारखं नेतृत्व देशपातळीवर आलं पाहिजे, असा आग्रह सर्वप्रथम मांडणारे अरुण जेटली आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. ते केवळ भाजप किंवा शिवसेनेचं नसून देशाचे नेते होते. देशावरील संकटांवेळी ते नेहमीच धावून आले आहेत. आंतराराष्ट्रीय पातळीवर देशाची बाजू प्रभावीपणे ते मांडत असत. क्रिकेट, उद्योग आणि राजकारणापलिकडील श्रेत्रातही त्यांचा प्रामुख्याने वावर होता. शिवसेनेसोबत 2014 साली भाजपाचे संबंध तुटल्यानंतर अस्वस्थ झालेले नेते अरुण जेटली होते. घटकपक्षांना सन्मान देण्याची त्यांची आग्रही भूमिका होती. सुषमाजींच्या निधनानंतर अरुणजींचं जाणं हे देशाच्या राजकारणातील दोन मोठे स्तंभ कोसळण्यासारखं आहे. आज आमचा मोठा भाऊ गेला, अशा शब्दात संजय राऊत यांनी जेटलींटच्या निधानानंतर शोक व्यक्त केला आहे. 

अरुण जेटली जितके विद्वान होते, तितकेच नम्र होते. विद्यार्थी दशेपासून त्यांनी भाजपाची जबाबदारी स्विकारली होती. सर्वांना सोबत घेऊन चालणारं सर्वसमावेश नेतृत्व हरपलं, अशी भावनिक प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. जीएसटी प्रकियेत सर्वात मोठी भूमिका निभावणारा हा नेता होता. विद्यार्थी दशेपासून ते आम्हाला सिनीयर होते. दिल्लीच्या प्रत्येक प्रवासात, त्यांची भेट आमच्यासाठी महत्त्वाची असायची. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदापासून ते देशाच्या अर्थमंत्रीपदापर्यंत त्यांचे योगदान मोठं असल्याची प्रतिक्रिया देत, पाटील यांनी जेटलींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.   

Web Title: Arun jaitaly passed away, bringing narendra Modi into national politics!' says Sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.