'2012 मध्ये गळा फाडून ओडरणारे देशभक्त आता पांघरुन घेऊन झोपलेत का?'

By महेश गलांडे | Published: February 17, 2021 07:14 PM2021-02-17T19:14:05+5:302021-02-17T19:16:29+5:30

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता.

"Are the patriots who used to slit their throats before 2012 now cover themselves and sleep?", RJD to amitabh on petrol and diesel | '2012 मध्ये गळा फाडून ओडरणारे देशभक्त आता पांघरुन घेऊन झोपलेत का?'

'2012 मध्ये गळा फाडून ओडरणारे देशभक्त आता पांघरुन घेऊन झोपलेत का?'

Next
ठळक मुद्देसन 2012 च्या पूर्वीचे देशभक्त 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोलच्या आणि 30 ते 35 रुपय लिटर डिझेलच्या किंमतीवर गळा फाडून ओरडत होते., तेंव्हा यांच्या काळजाला आग लागली होती. आता, शेतकरी, सर्वसामान्य आमि गरीब माणूस महागाईनं मरायला लागलाय

मुंबई - देशात काँग्रेस आघाडीचं सरकार असताना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन सेलिब्रिटींनी आवाज उठवला होता. पेट्रोलमुळे महागाई वाढल्याचं ट्विट या सेलिब्रिटींनी केलं होत. त्यामध्ये, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचा समावेश होता. आता, देशात पेट्रोलने शंभरी गाठली आहे, तरीही हे सेलिब्रिटी काहीही बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे, या अभिनेत्यांचे जुने ट्विट व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरुन या सेलिब्रिटींना नेटीझन्स प्रश्न विचारत आहेत. बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या सेलिब्रिटींच्या गप्प बसण्यावर टीका केलीय.     

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता. आता, राजदनेही ट्विट करुन महानायकासह इतरांनाही आता गप्प का, पांघरुन घेऊन झोपलात का? असा सवाल विचारला आहे. 

सन 2012 च्या पूर्वीचे देशभक्त 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोलच्या आणि 30 ते 35 रुपय लिटर डिझेलच्या किंमतीवर गळा फाडून ओरडत होते., तेंव्हा यांच्या काळजाला आग लागली होती. आता, शेतकरी, सर्वसामान्य आमि गरीब माणूस महागाईनं मरायला लागलाय. पण, हे निर्लज्जपणाची चादर पांघरुन झोपलेत, असे ट्विट बिहारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने केले आहे. या ट्विटसोबत राजदने बिग बी अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, अनुपम खेर आणि चेतन भगत या सेलिब्रिटींचे जुने ट्विट शेअर केले आहेत.


सन 2012 साली या सेलिब्रिटींनी ट्विट करुन पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. मात्र, सध्या पेट्रोल 100 रुपयांपर्यंत पोहोचले असतानाही हे सर्व गप्प आहेत. त्यामुळे, या सेलिब्रिटींविरुद्ध सर्वसामान्य नागरिकही प्रश्न विचारत आहेत.

भाई जगताप यांनीही केलं होतं लक्ष्य

देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शंभरीकडे वाटचाल सुरू असताना हे कलाकार शांत का?  असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. भाई जगताप यांनी बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खैर यांनी २०१२ साली केलेल्या ट्विटची आठवण करुन दिली आहे. केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी रामायणाचा दाखल देत गाड्या कॅशमध्ये करता येतील पण पेट्रोलसाठी कर्ज काढावं लागेल असं म्हटलं होतं. तर अक्षय कुमारने आता सायकल चालवण्याची वेळ आली आहे असं म्हटलं होतं. यासोबतच अनुपम खैर यांनी एक विनोद ट्विट करत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन काँग्रेस सरकारची खिल्ली उडवली होती. 

Web Title: "Are the patriots who used to slit their throats before 2012 now cover themselves and sleep?", RJD to amitabh on petrol and diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.