काँग्रेसला अजून एक धक्का; या राज्याचे माजी मुख्यमंत्री करणार वेगळ्या पक्षाची घोषणा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 11:00 AM2019-08-18T11:00:34+5:302019-08-18T11:02:00+5:30

काॅंग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काॅंग्रेसचे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काॅंग्रेसला साेडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.

Another shock to Congress; Former Chief Minister of this state will announce a different party? | काँग्रेसला अजून एक धक्का; या राज्याचे माजी मुख्यमंत्री करणार वेगळ्या पक्षाची घोषणा ?

काँग्रेसला अजून एक धक्का; या राज्याचे माजी मुख्यमंत्री करणार वेगळ्या पक्षाची घोषणा ?

Next

चंदिगड - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेससमोरील अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही आहेत. आता हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात दीर्घकाळापासून काँग्रेसचा चेहरा असलेले भूपेंद्रसिंह हुड्डा रविवारी समर्थकांच्या एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करणार असून, या सभेत हुड्डा हे वेगळ्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या अनेक आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र पक्षाच्या हंगामी अध्यक्ष  सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट न झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भूपेंद्रसिंह हुड्डा आज रोहतक येथे महापरिवर्तन रँलीला संबोधित करणार आहेत. यावेळी ते नव्या पक्षाची घोषणा करतील किंवा राज्यात इतर पक्षांक्षी आघाडी करून निवडणूक लढवतील, असे सांगण्यात येत आहे.
 
हरियाणामध्ये यावर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र ही निवडणूक हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास पक्षनेतृत्व अनुकूल नाही.  शनिवारी दिल्लीत झालेल्या बैठकीतसुद्धा हरियाणामधील पक्षसंघटनेतील फेरबदलांबाबत चर्चा झाली होती. 

लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे राज्यात नेतृत्वबदल करण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे. मात्र दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये असलेल्या भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणूक लढवण्यात यावी आणि त्यांनाच पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उमेदवार घोषित करावे, असा हुड्डा यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत हुड्डा काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Another shock to Congress; Former Chief Minister of this state will announce a different party?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.