येदियुरप्पांविरुद्ध आणखी एक भ्रष्टाचाराचा आरोप; काँग्रेसची सीबीआय, ईडीमार्फत चौकशीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 09:22 AM2021-07-12T09:22:00+5:302021-07-12T09:24:44+5:30

BS yediyurappa : येदियुरप्पा यांच्याविरोधात आणखी एका भ्रष्टाचाराच्या गौप्यस्फोटानं खळबळ. काँग्रेसमार्फत सीबीआय, ईडीकडून चौकशी करण्याची मागणी.

Another corruption charge against karnataka cm yediyurappa congress demands cbi ed enquiry | येदियुरप्पांविरुद्ध आणखी एक भ्रष्टाचाराचा आरोप; काँग्रेसची सीबीआय, ईडीमार्फत चौकशीची मागणी 

येदियुरप्पांविरुद्ध आणखी एक भ्रष्टाचाराचा आरोप; काँग्रेसची सीबीआय, ईडीमार्फत चौकशीची मागणी 

googlenewsNext
ठळक मुद्देयेदियुरप्पा यांच्याविरोधात आणखी एका भ्रष्टाचाराच्या गौप्यस्फोटानं खळबळ.काँग्रेसमार्फत सीबीआय, ईडीकडून चौकशी करण्याची मागणी.

शीलेश शर्मा

कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (केएसपीसीबी) माजी अध्यक्ष डॉ. सुधींद्र राव यांनी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या आणखी एका भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली असून, काँग्रेसने भाजप नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधून  याप्रकरणी सीबीआय, ईडीसह अन्य संस्थेमार्फत चौकशीची मागणी केली आहे. या सरकारी पदावर नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी   १६ कोटी रुपये मागितल्याचा गौप्यस्फोट करताना  सुधींद्र राव यांनी स्वत: सौदा कसा झाला, त्यासाठी काय काय करावे लागले, हे सविस्तरपणे सांगितले. ३० डिसेंबर  २०१९ मध्ये  सुधींद्र राव यांची  केएसपीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती याच वायद्याने करण्यात आली होती की,  १६ कोटींची रक्कम ते आपल्या कार्यकाळात चुकती करतील.

सुधींद्र राव म्हणाले की, ही रक्कम उभी करण्यासाठी मला माझी संपत्तीही विकावी लागली.  काँग्रेसचे नेते गुंडूराव यांनी सीबीआय, ईडीमार्फत चौकशीची मागणी केली.

व्हिडिओत काय? 

  • व्हिडिओ बातचीतमध्ये  सुधींद्र राव यांनी  दिलेल्या माहितीनुसार रोख ९.७५ कोटी रुपये  मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे नातेवाईक मरईस्वामी यांना वेगवेगळ्या तारखांना देण्यात आले. 
  • ही रक्कम जानेवारी ते फेब्रुवारी २०२० दरम्यान देण्यात आली. त्यानंतर मरईस्वामी यांनी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र आणि नातू शशिधर मार्डी, जवळचे नातेवाईक संजय श्री यांच्याशी सुधींद्र राव यांची भेट घालवून दिली.  
  • या भेटीत राव यांच्यासमक्ष नवीन अटी ठेवण्यात आल्या.

Web Title: Another corruption charge against karnataka cm yediyurappa congress demands cbi ed enquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.