बापरे! कोरोना आणि बर्ड फ्लूनंतर आता आणखी एका रहस्यमयी आजाराचं संकट; प्रशासनाच्या चिंतेत भर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 11:30 AM2021-01-23T11:30:40+5:302021-01-23T11:41:36+5:30

Mysterious Disease : देशात कोरोना व्हायरस आणि बर्ड फ्लूचं संकट असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराचा प्रकोप पाहायला मिळत आहे. 

andhra pradesh mysterious disease grips 700 people within 45 days | बापरे! कोरोना आणि बर्ड फ्लूनंतर आता आणखी एका रहस्यमयी आजाराचं संकट; प्रशासनाच्या चिंतेत भर 

बापरे! कोरोना आणि बर्ड फ्लूनंतर आता आणखी एका रहस्यमयी आजाराचं संकट; प्रशासनाच्या चिंतेत भर 

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. देशातील एकून कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचे संकट असतानाच देशात बर्ड फ्लूचं संकट आला आहे. शेकडो पक्ष्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोना व्हायरस आणि बर्ड फ्लूचं संकट असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराचा प्रकोप पाहायला मिळत आहे. 

नव्या आजाराने लोकांना विळखा घातला असून शेकडो लोकांना त्यांची लागण झाली आहे. या रहस्यमयी आजारामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली असून प्रशासनाची ही चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशमध्ये या नव्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कोमीरपल्ली गावात गेल्या 45 दिवसांत तब्बल 700 हून अधिक लोक आजारी पडले आहेत. तापासोबतच या गावामध्ये रहस्यमयी आजारीचं सारखीच लक्षणं ही 22 लोकांमध्ये आढळून आली आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, रहस्यमयी आजार असलेल्या लोकांनी एलरू येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच दरम्यान आंध्र प्रदेशचे आरोग्य मंत्री अल्ला काली कृष्णा यांनी गावाचा दौरा केला आणि लोकांची विचारपूस केली. एकंदरीत परिस्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेतलं. गावामध्ये मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच डॉक्टरांच्या अनेक टीम्स या गावागावात जाणून लोकांची तपासणी करत आहेत. तसेच या आजाराचा नेमका शोध घेण्यासाठी नमुने जमा करण्यात आले असून त्याची तपासणी केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोना लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू?; कुटुंबीयांची लसीविरोधात तक्रार, केला गंभीर आरोप

देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट देखील पाहायला मिळत आहेत. हरियाणातील गुरुग्राममध्ये कोरोनावरील लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. मात्र या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनावरील लस घेतल्याने झाला आहे की इतर कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट झालेलं नाही. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी कोरोना लसीबाबत तक्रार दाखल केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूची सध्या चौकशी सुरू आहे. पोस्टमार्टम अहवालातून काहीही स्पष्ट झालेल नाही अशी माहिती गुरुग्रामच्या सीएमओने दिली आहे.

 

Read in English

Web Title: andhra pradesh mysterious disease grips 700 people within 45 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.