स्थलांतरित मजुरांसाठी आंध्र सरकारच पॅकेज, जगनमोहन यांचं विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 05:42 AM2020-04-17T05:42:25+5:302020-04-17T05:42:42+5:30

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे

Andhra government package for migrant laborers | स्थलांतरित मजुरांसाठी आंध्र सरकारच पॅकेज, जगनमोहन यांचं विशेष लक्ष

स्थलांतरित मजुरांसाठी आंध्र सरकारच पॅकेज, जगनमोहन यांचं विशेष लक्ष

Next

हैदराबाद : अन्य राज्यांतून आलेल्या स्थलांतरित मजुरांनी धोका पत्करून घरी परत जाण्याचा आटापिटा न करता ‘लॉकडाऊन’ संपेपर्यंत त्यांना सध्या ज्या शिबिरांमध्ये ठेवले आहे तेथेच राहण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे यासाठी आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्याशी एक आकर्षक ‘पॅकेज’ देऊ केले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे. हे पैसे त्यांना सुरक्षित वाहनाने घरी परत जायला व तेथे गेल्यानंतर पुढे काही दिवस जेवणाखाण्यासाठी उपयोगी पडतील, असा सरकारचा विचार आहे. आता या स्थलांतरितांना डाळ किंवा सांबार भाताखेरीज दूध, अंडे, फळे, सुकामेवा, संत्रावर्गीय फळ व केळेही देण्यात येत आहे. असा प्रत्येक स्थलांतरित मजुरावर राज्य सरकार जेवण, निवास व्यवस्था, प्रवास व स्वच्छतागृहे यासाठी दिवसाला प्रत्येकी ८५० रुपये खर्च करीत आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था)

उद्धव ठाकरे यांना ममता बॅनर्जींचा फोन
च्कोलकाता : महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आदी राज्यांत लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या बंगाली मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना स्थानिक यंत्रणा व लोकांशी समन्वय साधून पश्चिम बंगाल सरकारतर्फे आर्थिक मदत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी जाहीर केले.
च्महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांच्या देखभालीसाठी योग्य प्रकारे काम करत असल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून त्यांचे आभार मानले.

च्मुंबईत अडकून पडलेले हजारो स्थलांतरित मजूर वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या बाहेर बुधवारी जमा झाले. आम्हाला गावी परतायचे असून त्यासाठी विशेष ट्रेन चालवाव्यात अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीचे राजकीय भांडवल करण्याचा काही जणांकडून प्रयत्न होत असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली. महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांसाठी करत असलेल्या कार्यात पश्चिम बंगाल सरकार सहकार्य करण्यास तयार आहे असे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून सांगितले.
च् मुंबईप्रमाणेच गुजरातमधील सूरत येथेही अडकून पडलेले स्थलांतरित मजूर आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. या आठवड्यात दुसऱ्यांदा असा प्रकार तिथे घडला आहे.

प. बंगालमध्ये अडकले दोन लाख मजूर
च्देशातील १८ राज्यांमध्ये हजारो बंगाली मजूर अडकून पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अन्य राज्यातून आलेले २ लाख स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्या सर्वांच्या राहाण्याची व जेवणाची सोय राज्य सरकारने ७११ निवारा छावण्यांत केली आहे.

Web Title: Andhra government package for migrant laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.