Anantnag (J&K) terrorist attack: 3 CRPF personnel have lost their lives, 2 CRPF personnel injured, SHO Anantnag also critically injured. One terrorist neutralized. | अनंतनाग येथे CRPF च्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद
अनंतनाग येथे CRPF च्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद

जम्मू काश्मीरः जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अनंतनाग येथील केपी रोडवर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच सीआरपीएफचे जवान शहीद झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथील केपी रोडवर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले.  दरम्यान   तसेच, याठिकाणी जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. 


दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम शाहबाग लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुरक्षा दलांनी 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.  


(अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा )


 

English summary :
Jammu and Kashmir is once again attacked by terrorists. CRPF jawans were fired by the terrorists on KP Road in Anantnag. Five CRPF jawans were martyred in this firing.


Web Title: Anantnag (J&K) terrorist attack: 3 CRPF personnel have lost their lives, 2 CRPF personnel injured, SHO Anantnag also critically injured. One terrorist neutralized.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.