जावयाच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याची आत्महत्या, वडिलांच्या मृत्यूबाबत मुलगी म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 02:54 PM2020-03-09T14:54:04+5:302020-03-09T15:15:39+5:30

वडिलांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना अमृताने फारसे दु:ख व्यक्त केले नाही. वडिलांच्या मृत्युबाबत आम्हाला टीव्हीवरुनच समजले.

Amruta says suicide of goat betrothed, about khairatabad murder case MMG | जावयाच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याची आत्महत्या, वडिलांच्या मृत्यूबाबत मुलगी म्हणते...

जावयाच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याची आत्महत्या, वडिलांच्या मृत्यूबाबत मुलगी म्हणते...

Next

हैदराबाद - आपल्या मुलीने आतंरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीची तिच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली होती. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे 14 सप्टेंबर 2018 मध्ये ही घटना घडली होती. या हत्याप्रकरणातील मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. याबाबत, मुलीने प्रतिक्रिया देताना, आम्हाला वडिलांच्या मृत्यूबद्दल कुणीही माहिती दिली, नसल्याचे तिने म्हटले. तसेच, टीव्हीवरील बातम्यांमधून आम्हाला याबाबत समजल्याचेही तिने सांगितले. 

दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम, पण मुलीकडून लग्नाला विरोध होता. अखेर घरच्यांचा विरोध डावलून दोघांनीही पळून जावून आपला संसार थाटला. पण, त्यांच्या या संसाराला त्यांच्याच जन्मदात्यांची नजर लागली. आपल्या मुलीने दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत लग्न केलं याचा राग धरून मुलीसमोरच तिच्या प्रियकराचा निर्घृण खून करण्यात आला. सैराट चित्रपटाची कथा सत्यात उतरावी असेच काहीसे तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे घडले होते. त्यानंतर, अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आजही मुलगी अमृता तिच्या सासरी लहानशा प्रणयसोबत राहत आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. 

वडिलांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना अमृताने फारसे दु:ख व्यक्त केले नाही. वडिलांच्या मृत्युबाबत आम्हाला टीव्हीवरुनच समजले. प्रणयच्या मृत्यूपासून माझं कुटुंबींयांशी काहीही बोलणं झालं नाही. कदाचित, वडिलांना प्रणयच्या हत्येचा पश्चाताप झाला असेल, म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे अमृताने माध्यमांशी बोलताना म्हटले. 

दरम्यान, शनिवारी रात्री खैरताबाद येथील आर्यवैश्य भवनमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत मारुतीराव यांनी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेनं पुन्हा खळबळ माजली आहे. तेलंगणातील या 'ऑनर किलिंग' प्रकरणामुळे देश हादरला होता. आपल्या मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडील टी. मारुती राव यांनी ख्रिश्चन दलित समाजातील पेरुमला प्रणय याची हत्या करण्यासाठी एक कोटींची सुपारी दिली होती. त्यानंतर, मारेकऱ्यानं भर रस्त्यात अमृतासमोरच प्रणयवर वार केल्याचा भीषण व्हिडीओ सोशल मीडियावरुन जगभर व्हायरल झाला. हैदराबादपासून 80 किलोमीटरवरील एका भव्य राजवाड्यात अमृता आणि प्रणय यांनी प्री-वेडिंग व्हिडीओ शूट केला होता. 

Web Title: Amruta says suicide of goat betrothed, about khairatabad murder case MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.