'बॉयकॉट चायना' सुरू असतानाच चीनच्या सरकारी बँकेने विकत घेतले ICICI बँकेचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:54 PM2020-08-18T13:54:43+5:302020-08-18T14:00:38+5:30

चीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासारख्या इतर देशात गुंतवणूक वाढवत आहे. पीपल्स बँक ऑफ चायना ही म्यूचुअल फंड आणि विमा कंपन्यांसह, ICICI बँकेत 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 357 संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे.

Amid boycott china movement peoples bank of china buys stake into icici bank   | 'बॉयकॉट चायना' सुरू असतानाच चीनच्या सरकारी बँकेने विकत घेतले ICICI बँकेचे शेअर्स

'बॉयकॉट चायना' सुरू असतानाच चीनच्या सरकारी बँकेने विकत घेतले ICICI बँकेचे शेअर्स

Next
ठळक मुद्देचीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासारख्या इतर देशात गुंतवणूक वाढवत आहे. तज्ज्ञ सांगतात, की भारतात बँकिंग अत्यंत ग्युलेटेड म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीत चालणारा उद्योग आहे. यामुळे याचा देशाला धोका असू शकत नाही. चीनी बँकेने एचडीएफसीमधील आपली गुंतवणूक 1 टक्क्यांहून कमी केली होती. 

नवी दिल्ली - देशात चिनी मालाचा बहिष्कार होत असताना आणि चीनविरोधी वातावरण असतानाच चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने ICICI बँकेचे शेअर्स विकत घेतले आहेत. मात्र, यामुळे देश हिताला कसल्याही प्रकारचा धोका नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात चीनच्या केंद्रीय बंकेने  एचडीएफसीमध्ये आपली गुंतवणूक वाढवून 1 टक्क्यापेक्षाही अधिक केली होती. तेव्हा या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. पीपल्स बँक ऑफ चायना ही म्यूचुअल फंड आणि विमा कंपन्यांसह, ICICI बँकेत 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 357 संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे. ICICI बँकेने आपली आर्थिक स्थिती अधिक बळकट करण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पैसा मिळविण्याचा प्रयत्न केला होता आणि मागच्या आठवड्यातच त्यांचे टार्गेट पूर्ण झाले आहे. 

चिनी कंपनीची गुंतवणूक किती? 
चीनच्या केंद्रीय बँकेने ICICI बँकेत केवळ 15 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून ती क्वालिफाइड इंस्टिट्यूशनल प्लेसमेन्टच्या माध्यमाने करण्यात आली आहे. इतर परदेशी गुंतवणूकदारांत सिंगापूर सरकार, मॉर्गन इन्व्हेस्टमेंट, सोसाइटे जनराले आदिंचा समावेश आहे. तज्ज्ञ सांगतात, की भारतात बँकिंग अत्यंत ग्युलेटेड म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीत चालणारा उद्योग आहे. यामुळे याचा देशाला धोका असू शकत नाही. 

चीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासारख्या इतर देशात गुंतवणूक वाढवत आहे. गेल्या वर्षी चीनच्या याच बँकेच्या हाऊसिंग लोन कंपनी एचडीएफसी लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. यानंतर सरकारने परदेशी पोर्टफोलियो गुंतवणुकीचे नियम अधिक कठोर केले होते. विशेषतः चीन अथवा इतर शेजारी देशांतून येणाऱ्या गुंतवणुकीसाठी कठोर नियम बनवण्यात आले होते. यानंतर चीनी बँकेने एचडीएफसीमधील आपली गुंतवणूक 1 टक्क्यांहून कमी केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या -

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

 

 

 

Web Title: Amid boycott china movement peoples bank of china buys stake into icici bank  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.