Corona Vaccine: कोव्हॅक्सिनला धक्का! अमेरिकेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली; आता WHO कडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 03:45 PM2021-06-11T15:45:33+5:302021-06-11T15:46:02+5:30

Corona Vaccine: अमेरिकेने कोव्हॅक्सिन या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली आहे.

america fda denies bharat biotech covaxin emergency use approval | Corona Vaccine: कोव्हॅक्सिनला धक्का! अमेरिकेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली; आता WHO कडे लक्ष

Corona Vaccine: कोव्हॅक्सिनला धक्का! अमेरिकेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली; आता WHO कडे लक्ष

Next

नवी दिल्ली: स्वदेशी लस उत्पादक कंपनी असलेल्या भारत बायोटेकला अमेरिकेतील प्रवेशासाठी अद्याप काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण अमेरिकेने कोव्हॅक्सिन या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली आहे. अमेरिकेच्या फूड आणि एडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एफडीएने भारत बायोटेकने केलेला अर्ज फेटाळला आहे. (america fda denies bharat biotech covaxin emergency use approval)

भारत बायोटेकने अमेरिकेतील भागीदार ऑक्यूझेन कंपनीच्या माध्यमातून ‘एफडीए’कडे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली होती. मात्र, आता ‘एफडीए’ने मंजुरी देण्यास नकार दिला आहे. ‘एफडीए’ कोव्हॅक्सिन लसीचे आणखी एकदा परीक्षण करण्यास सांगितले आहे. आता यानंतर अमेरिकेकडे पूर्ण वापरासाठी मंजुरी मागितली जाईल, असे ऑक्युझेनकडून सांगण्यात आले आहे.

“भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘डूबती नैया’, काही झालं तरी NDA सोबत जाणार नाही”

अमेरिकेत कोव्हॅक्सिन आणण्यास कटिबद्ध

ऑक्युझेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शंकर मुसुनुरी यांनी म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन अमेरिकेत लॉन्च करण्यासाठी काहीसा विलंब होत असला, तरी भारत बायोटेकची निर्मिती असलेल्या कोव्हॅक्सिनला अमेरिकेत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अमेरिकन बायोफार्मा कंपनी असलेली ऑक्युझेन कोव्हॅक्सिनचे उत्पादन अमेरिकेत करणार आहे. यासाठी कॅनडा येथे लस उत्पादनाचे विशेष अधिकार कंपनीने प्राप्त करून घेतले आहेत. ‘एफडीए’ने ऑक्युझेनला कोव्हॅक्सिनसंदर्भात आणखी माहिती सादर करण्यास सांगितले आहे. तसेच आपत्कालीन वापराच्या मंजुरीऐवजी बायोलॉजिकल परवान्यासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. 

Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार असलेल्या डॉ. फाऊची यांनी कोव्हॅक्सिन ही लस कोरोनावर प्रभावी असल्याचे मान्य केले होते. मात्र, तरीही अमेरिकेने नाकारलेली मंजुरी भारत बायोटेकला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी भारत बायोटेकने WHO कडे कोव्हॅक्सिनला मान्यता मिळण्यासाठी अर्ज केला असून, अद्याप त्यावर उत्तर आले नसल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेत कोव्हॅक्सिनच्या वापरासाठी मंजुरी मिळाली, तर ती भारतासाठी मोठी उपलब्धी असेल, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: america fda denies bharat biotech covaxin emergency use approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.