Love Triangle : प्रेमासाठी भररस्त्यात मुलींमध्ये गँग वॉर; एका मुलासाठी लाथा-बुक्क्या-चेननं केली तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 12:45 PM2021-11-17T12:45:46+5:302021-11-17T12:47:36+5:30

अंबिकरपूरमध्ये भररस्त्यात दोन अल्पवयीन मुलींच्या गटांत जोरदार हाणामारी झाली. सुरुवातीला लोक दूरवर उभे राहून भांडण पाहत होते. पण...

Ambikapur Two girls groups clashed in love triangle in Chhattisgarh | Love Triangle : प्रेमासाठी भररस्त्यात मुलींमध्ये गँग वॉर; एका मुलासाठी लाथा-बुक्क्या-चेननं केली तुंबळ हाणामारी

Love Triangle : प्रेमासाठी भररस्त्यात मुलींमध्ये गँग वॉर; एका मुलासाठी लाथा-बुक्क्या-चेननं केली तुंबळ हाणामारी

googlenewsNext

मुलीच्या प्रेमप्रकरणावरून मुला-मुलांमध्ये हाणामारीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशा घटना नेहमीच समोर येत असतात. पण छत्तीसगडच्या अंबिकापूरमधून एक अशी घटना समोर आली आहे, जीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. येथे, एका मुलाच्या प्रेमप्रकरणातून दोन मुलींचे गट एकमेकांना भिडले. या वेळी दोन्ही गटांत प्रचंड शिवीगाळ झाली आणि प्रकरण अक्षरशः हाणामारीपर्यंत गेले. यावेळी दोन्ही गटांत भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी तुंबळ हाणामारी झाली. एवढेच नाही, तर या मुलींनी हातात चेन घेऊनही एकमेकींना पळवले देखील.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबिकरपूरमध्ये रस्त्यावर दोन अल्पवयीन मुलींच्या गटांत जोरदार हाणामारी झाली. यामुळे तेथे प्रचंड गर्दी झाली होती. सुरुवातीला लोक दूरवर उभे राहून भांडण पाहत होते. मात्र, प्रकरण वाढल्यानंतर स्थानिकांनी दोन्ही गटांना शांत केले. बारम रोडवर मधोमध झालेल्या या भांडणामुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Love Triangle चं प्रकरण - 
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या या दोन गटातील हाणामारीचे प्रकरण हे पूर्णपणे हाणामारीचे आहे. लोकांनी सांगितले, की येथील बरम पारा येथे राहणारी मुलगी एका मुलावर प्रेम करते. त्याच मुलावर शक्ती पारा येथे राहणाऱ्या मुलीचेही प्रेम आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर दोन्ही मुली नाराज झाल्या आणि आपापल्या गटातील मुलींना बोलावून त्यांनी रस्त्यातच हाणामारी केली. मुलींच्या हातात लोखंडी चेनही होती. अनेक मुलींनी हातात चेन घेऊन एकमेकांना पळवले. यासंदर्भात अद्याप पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचे निवेदन समोर आलेले नाही.

Web Title: Ambikapur Two girls groups clashed in love triangle in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.