मायावतींच्या 'एकला चलो रे'ला अखिलेश यादवांचे 'जशास तसे उत्तर' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 05:13 PM2019-06-04T17:13:17+5:302019-06-04T17:16:49+5:30

मायावती यांनी ईव्हीएमवरही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Akhilesh Yadav's same reply to mayawati on alliance of vidhan sabha byelection | मायावतींच्या 'एकला चलो रे'ला अखिलेश यादवांचे 'जशास तसे उत्तर' 

मायावतींच्या 'एकला चलो रे'ला अखिलेश यादवांचे 'जशास तसे उत्तर' 

Next

लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यादव समाजानं सपाला सोडलं आहे. समाजवादी पार्टीत सुधारणांची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत यादवांचं मतदान सपाला मिळालेलं नाही. आम्ही उत्तर प्रदेशमधली निवडणूक स्वबळावर लढवणार आहोत, असे म्हणत सपा-बसपा युती संपुष्टात आल्याचं सूचवल होत. मायवती यांच्या पत्रकार परिषदेनंतर अखिलेश यादव यांनीही मायावतींन जशास तसे उत्तर दिले आहे.  

मायावती यांनी ईव्हीएमवरही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कौटुंबिक संबंध कधीही तुटणार नाहीत. आम्ही दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढलेलं केव्हाही चांगलं राहील. आम्ही एकट्यानंच येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे. सपा-बसपा युतीला तूर्तास ब्रेक नाही. जर भविष्यात आम्हाला वाटलं की सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्याबरोबर राजकीय मतभेद दूर करण्यास यशस्वी झालो, तर आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करू. पण जर अखिलेशनी असं केलं नाही, तर आमची विधानसभा निवडणूक एकट्यानं लढण्याचा निर्णयच योग्य असेल, असंही मायावती म्हणाल्या आहेत. त्यानंतर, अखिलेश यांनीही पत्रकार परिषद घेऊन मायावतींना जशात तसे उत्तर दिले. 

जर युती तुटलीच आहे, आणि ज्या अटी व शर्ती आमच्यासमोर ठेवण्यात आल्या आहेत. त्याबाबत विचार करुन निर्णय घेऊ. मात्र, पोटनिवडणुकांसाठी युती नसेल, तर आम्हीही स्वतंत्रपणे निवडणूक लढायची तयारी करणार आहोत. समाजवादी पक्षाकडूनही 11 जागांवर उमेदवार उभे केले जातील. यावेळी, युतीपेक्षा झालेली राजकीय हत्या आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे. तसेच, जर मार्ग वेगवेगळे असतील तर त्याचे स्वागत आणि सर्वांनाच शुभेच्छा. सर्वांनीच आपला-आपला मार्ग निवडावा, असे म्हणत अखिलेश यांनीही स्वतंत्र होण्याची तयारी दर्शवली आहे. 
 

Web Title: Akhilesh Yadav's same reply to mayawati on alliance of vidhan sabha byelection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.