ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आणखी दोन आरोपींचे भारतात प्रत्यार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 09:03 AM2019-01-31T09:03:34+5:302019-01-31T09:05:22+5:30

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी आरोपी ख्रिश्चन मिशेलला भारतात आणल्यानंतर आणखी दोन आरोपींना पकडण्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पथकाला यश आले आहे. 

AgustaWestland scam co-accused Rajeev Saxena, lobbyist Deepak Talwar extradited to India | ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आणखी दोन आरोपींचे भारतात प्रत्यार्पण

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आणखी दोन आरोपींचे भारतात प्रत्यार्पण

Next
ठळक मुद्देअंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दुबईतील अकाऊंटंट राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांचे दुबईहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. या दोघांना सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.  आज दुपारी दोन वाजता या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी आरोपी ख्रिश्चन मिशेलला भारतात आणल्यानंतर आणखी दोन आरोपींना पकडण्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पथकाला यश आले आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दुबईतील अकाऊंटंट राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांचे दुबईहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांना बुधवारी रात्री उशिरा दिल्लीला आणण्यात आले. दुबईमधील अधिकाऱ्यांनी त्यांना बुधवारी सकाळी आपल्या ताब्यात घेतले होते. तसचे, या दोघांना सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.  

पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांची अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय चौकशी करत आहे. आज दुपारी दोन वाजता या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दुबईत राहणाऱ्या राजीव सक्सेनाला अंमलबजावणी संचालनालयाने अनेकदा चौकशीसाठी समन्स पाठविले होते. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. तसेच, राजीव सक्सेना याची पत्नी शिवानी सक्सेना हिला 2017 मध्ये चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली होती. सध्या तिची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

(Agusta Westland Scam : ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारताला धक्का, इटलीतील कोर्टानं सर्व आरोपींना ठरवलं निर्दोष)

Web Title: AgustaWestland scam co-accused Rajeev Saxena, lobbyist Deepak Talwar extradited to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.