ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा, सुरक्षा यंत्रणेची धावपळ, तरुण ताब्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 11:47 AM2021-03-04T11:47:31+5:302021-03-04T12:04:14+5:30

Taj Mahal Bomb Hoax Call : मूळचा फिरोजाबादचा असणाऱ्या या तरुणाने फोन करुन बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर परिसरात खळबळ माजली होती.

agra chaos at taj mahal after bomb call search operation on all three gates are closed | ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा, सुरक्षा यंत्रणेची धावपळ, तरुण ताब्यात!

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा, सुरक्षा यंत्रणेची धावपळ, तरुण ताब्यात!

Next
ठळक मुद्देपर्यटकांना तातडीने बाहेर काढले. तसेच ताजमहलचे तिन्ही गेट बंद करण्यात आले.

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा कॉल आल्यानंतर गुरुवारी  सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली. मूळचा फिरोजाबादचा असणाऱ्या या तरुणाने फोन करुन बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर परिसरात खळबळ माजली होती.

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची सूचना सुरक्षा यंत्रणांना एका अज्ञात फोन कॉलवरून मिळाली. यानंतर परिसरारत एकच खळबळ उडाली. यावेळी सीआयएसएफ आणि उत्तर प्रदेशपोलिसांनी ताजमहालमध्ये उपस्थित असलेल्या पर्यटकांना तातडीने बाहेर काढले. तसेच ताजमहालचे तिन्ही गेट बंद करण्यात आले.

दरम्यान, बॉम्बची सूचना देणाऱ्या फोननंतर सुरक्षा यंत्रणेकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली. यानतंर ज्या क्रमांकावर फोन आला त्यासंबंधी तपास केला असता ही अफवा असल्याचे समोर आले. मूळचा फिरोजाबादचा असणाऱ्या तरुणाने फोन करुन बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिल्याचे उघड झाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, त्याची चौकशी केली जात आहे. 

भरती रद्द झाल्यामुळे बनावट कॉल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल नंबर शोधून काढल्यानंतर हा फोन फिरोजाबादचा असल्याचे समजले. आग्रा पोलिसांनी फिरोजाबाद पोलीस प्रशासनाला सतर्क केले. त्याठिकाणी हा तरुण ताब्यात घेण्यात आला. सैन्य भरती रद्द झाल्यामुळे हा तरुण नाराज झाला होता, त्यामुळे त्याने असा बनावट कॉल केला.

Web Title: agra chaos at taj mahal after bomb call search operation on all three gates are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.