After China Back Pakistan wants Peace on LOC; talks on hotline with India | LOC: चीनच्या जिवावर उडणारा पाकिस्तान भेदरला; भारताला हॉटलाईनवर शांततेचा प्रस्ताव

LOC: चीनच्या जिवावर उडणारा पाकिस्तान भेदरला; भारताला हॉटलाईनवर शांततेचा प्रस्ताव

भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या चीनने माघार घेताच त्यांच्या जिवावर भारताला आव्हाने देणारा पाकिस्तान (Pakistan) जमिनीवर आला आहे. भारताला हॉटलाईनवर आता आम्हाला एलओसीवर (Line of Control) शांती हवी आहे, अशा शब्दांत विनवणी करत आहे. आज दोन्ही देशांच्या मिलिट्री ऑपरेशन्सच्या डायरेक्टर जनरलनी (DGMO) फोनवर चर्चा केली आणि सीमेवर शांती प्रस्थापित करण्यासाठी सहमती बनविली. (Pakistan talks on Hotline with India on LOC Peace.)


प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LOC) शांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने सर्व करार आणि शस्त्रसंधीचे कडक पालन करणार असल्याचे सांगितले. याला भारतानेही सहमती दिली आहे. ही शस्त्रसंधी 24-25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 


दोन्ही देशांच्या जनरलनी एओसीसह सर्व सीमाभागातील स्वतंत्र आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यास सहमती दर्शविली. एओसीबाबत जे काही याआधी समझोते झाले आहेत ते पाळण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे. तसेच कोणतीही अफवा किंवा गैरसमज दूर करण्यासाठी हॉटलाईनवर चर्चा करण्याबाबतही दोन्ही जनरलनी सहमती दर्शविली आहे. याचबरोबर बॉर्डरवर फ्लॅग मिटिंग घेण्याचे ठरविले आहे. 


Galwan Clash: चीनकडून गलवान घाटीतील हिंसाचाराचा Video जारी; म्हणाला 'भारतच हल्लेखोर'

या प्रकारे एलएसीनंतर एलओसीवर देखील शांती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतू पाकिस्तानव विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी नेहमी विश्वासघात केला आहे. एकीकडे भारतावर घुसखोरी करण्याचे आरोप करायचे आणि दुसरीकडे सीमेपलिकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करायचे असा दुटप्पीपणा पाकिस्तान करत आला आहे. चीनने भारतीय जवानांवर हल्ला केला तेव्हाही पाकिस्तानने संधी साधण्याचा प्रयत्न केला होता. सैन्याला भारताशी युद्ध करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील भारतासोबत युद्धखोरीची भाषा केली होती. परंतू चीनची डाळ न शिजल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा जमिनीवर आला आहे. 

अखेर चीनने गलवानमधील नामुष्की कबूल केली
गतवर्षी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. (India China faceoff ) या तणावादरम्यान, भारतीय लष्कर (Indian Army) आणि चिनी सैन्यामध्ये (PLA) हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र चीन सरकारकडून या झटापटीत चिनी सैन्याची जीवितहानी झाल्याचे वृत्त सातत्याने नाकारले जात होते. मात्र आता चिनी सरकारने या झटापटीत आपले सैनिक मारले गेल्याचे कबूल केले आहे. तसेच या सैनिकांची नावेही जाहीर केली आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After China Back Pakistan wants Peace on LOC; talks on hotline with India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.