काँग्रेस नेते म्हणाले, "होय, मी पाकिस्तानी! देश मोदी-शाहांच्या बापाचा नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 12:48 PM2020-01-16T12:48:41+5:302020-01-16T12:55:05+5:30

'भारत कोणाच्या बापाची संपत्ती नाही'

adhir ranjan chowdhury pakistan statement modi government amit shah congress | काँग्रेस नेते म्हणाले, "होय, मी पाकिस्तानी! देश मोदी-शाहांच्या बापाचा नाही"

काँग्रेस नेते म्हणाले, "होय, मी पाकिस्तानी! देश मोदी-शाहांच्या बापाचा नाही"

Next

कोलकाता : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir  Ranjan Chaudhari) हे आपल्या वक्तव्यांनी कायम वादात सापडतात. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना अधीर रंजन चौधरी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. भाजपाकडून माझा परिचय पाकिस्तानचे असल्याचे करून देण्यात येतो. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की, मी पाकिस्तानी आहे, असे वक्तव्य अधीर रंजन चौधरी केले आहे. 

पश्चिम बंगालमधील नॉर्थ 24 परगनामध्ये अधीर रंजन चौधरी म्हणाले, "मला पाकिस्तानी म्हणून बोलविले जाते. आज मी सांगू इच्छितो की, मी पाकिस्तानी आहे. तुम्हाला जे करायचे आहे, ते करू शकता. आज आपल्या देशात कोणीच खरे बोलू शकत नाही, कारण तुम्ही खरे बोलले तर तुम्हाला देशद्रोही घोषित केले जाते."

याचबरोबर, अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, "आज आपण कोठे राहत आहेत? नरेंद्र मोदी आणि अमित शाह म्हणतील, तेच आपल्याला करायला सांगितले जाते. आम्हाला ते मान्य नाही. हा देश नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या वडिलांचा नाही. भारत कोणाच्या बापाची संपत्ती नाही. त्या दोघांनी या गोष्ट समजून घेतली पाहिजे की, जे आज आहे ते उद्या राहणार नाही." 

दरम्यान, याआधी अधीर रंजन चौधरी यांनी नरेंद मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. NRCबद्दल कुठलीच चर्चा नाही असे मोदी म्हणाले. पण त्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवणार. कारण मोदी आणि शाह म्हणजे रामू-श्यामूची जोडी आहे. ते दोघही लोकांची दिशाभूल करण्याचे मास्टर असल्याने त्यांच्यावर विश्वास नाही अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. 

(निर्मला सीतारामन माझी बहीण; 'निर्बला' विधानावर अधीर रंजन चौधरी यांचा माफीनामा)

याशिवाय, लोकसभेत कार्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या चर्चेत सहभाग घेताना अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा उल्लेख 'निर्बला' सीतारामन असा केला. त्याला सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत संसदेत काहीकाळ गोंधळ घालत माफीची मागणी केली. यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी संसदेत निर्मला सीतारामन माझ्या बहिणीसारख्या असल्याचे सांगत माफी मागितली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांचं निलंबन

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

36 केंद्रीय मंत्री जम्मू-काश्मीरचा दौरा करणार, सरकारच्या योजनांची माहिती देणार

'अच्छे दिन' येतील तेव्हा येतील, पण निदान आधीचे 'बरे दिन' तरी आणा; महागाईवरुन शिवसेनेचा टोला

दिल्लीत उघडली सिंचन घोटाळ्याची फाईल!; अजित पवार अडचणीत येणार?

काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरूच; धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द

Web Title: adhir ranjan chowdhury pakistan statement modi government amit shah congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.