पाकचे अतिरिक्त दोन हजार सैनिक सीमेवर तैनात; भारताचे बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 06:45 AM2019-09-06T06:45:31+5:302019-09-06T06:46:05+5:30

घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ : दहशतवाद्यांना केली जातेय मदत

An additional two thousand soldiers of Pakistan deployed at the border; India's Fine Attention | पाकचे अतिरिक्त दोन हजार सैनिक सीमेवर तैनात; भारताचे बारीक लक्ष

पाकचे अतिरिक्त दोन हजार सैनिक सीमेवर तैनात; भारताचे बारीक लक्ष

googlenewsNext

नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावरून भारत व पाकिस्तानमधील तणावात वाढ झाली असतानाच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकव्याप्त काश्मीरमधील बाघ व कोटली येथे पाकिस्तानने दोन हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. पाक लष्कराच्या हालचालींवर भारतीय जवान बारीक नजर ठेवून आहेत.

यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून तीस किमी दूर अंतरावर पाकिस्तानच्या या दोन हजार सैनिकांनी तळ ठोकला आहे. लष्कर-ए-तय्यबा व जैश-ए-मोहम्मद या संघटनांनी पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांना व अफगाणी नागरिकांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये भरती करण्यास सुरुवात केली आहे. या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करता यावी, यासाठी वाढीव फौजफाटा पाकिस्तानने सीमेजवळ आणून ठेवल्याचे सांगण्यात येते. भारताने ३७० कलमातील अनेक तरतुदी रद्द केल्यानंतर सीमेपलीकडून काश्मीरमध्ये होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ झाली आहे. त्यासाठी दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्करातील स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचे (एसएसजी) सैनिक मदत करतात. भारतीय जवानांनी नुकत्याच दिलेल्या चोख प्रत्युत्तरात एसएसजीचे दहा सैनिक ठार झाले होते.
दहशतवाद्यांकरवी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर घातपाती कारवाया करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा आहे. काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय स्तरावर कांगावा करण्याचे पाकिस्तानचे सारे प्रयत्न फोल ठरले आहेत.

गुजरात सीमेवर हालचाली
काश्मीरमध्येच नव्हे, तर गुजरातला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीर क्रीक भागातही पाकिस्तानने आपले सैनिक आणून ठेवले आहेत. काळ््या यादीत समावेश करण्याच्या फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिलेल्या इशाºयानंतर काही काळ थांबवलेली दहशतवाद्यांची भरती पाकिस्तानने आता नव्याने सुरू केल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: An additional two thousand soldiers of Pakistan deployed at the border; India's Fine Attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.