अभिनेत्री पायल रोहतगीला वादग्रस्त पोस्ट भोवली; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 02:58 PM2019-12-16T14:58:44+5:302019-12-16T14:59:53+5:30

एसीजेएम हनुमान जाट यांनी पायलची याचिका फेटाळून लावली. तसेच 24 डिसेंबरपर्यंत तिची कारागृहात रवानगी केली. प्रदेश युवा काँग्रेसचे महासचिव आणि बुंदी येथील रहिवासी चर्मेश शर्मा यांनी पायल विरुद्ध तक्रार दाखल केली होती. 

Actress Payal Rohatgi controversial post; Court rejects bail application | अभिनेत्री पायल रोहतगीला वादग्रस्त पोस्ट भोवली; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

अभिनेत्री पायल रोहतगीला वादग्रस्त पोस्ट भोवली; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Next

मुंबई - सोशल मीडियावर गांधी-नेहरू कुटुंबाविषयी वादग्रस्त पोस्ट शेअर करणे अभिनेत्री पायल रोहतगी हिला चांगलेच महागात पडले आहे. वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल पायल हिला अटक करण्यात आली होती. आता न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला असून तिचा कारागृहातील मुक्काम लांबला आहे. 

अटक केल्यानंतर पायल हिने न्यायालयाकडे जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र बुंदी न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला असून 24 डिसेंबरपर्यंत तिची रवानगी कारागृहात केली आहे. तिला रविवारी अहमदाबाद येथील तिच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. 

मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि गांधी-नेहरू कुटुंबातील सदस्यांसंदर्भात पायलने आपत्तीजनक पोस्ट शेअर केली होती.  त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी माहिती आणि प्राद्योगिक कायद्याअंतर्गत राजस्थानमधील बुंदी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. याच महिन्यात तिला एक नोटीस देखील देण्यात आली होती.

दरम्यान बुंदी पोलीसांनी पायलला एसीजेएम न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजुंच ऐकूण घेतल्यानंतर एसीजेएम हनुमान जाट यांनी पायलची याचिका फेटाळून लावली. तसेच 24 डिसेंबरपर्यंत तिची कारागृहात रवानगी केली. प्रदेश युवा काँग्रेसचे महासचिव आणि बुंदी येथील रहिवासी चर्मेश शर्मा यांनी पायल विरुद्ध तक्रार दाखल केली होती. 

Web Title: Actress Payal Rohatgi controversial post; Court rejects bail application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.