Actor Sunny Deol joins Bharatiya Janata Party in presence of Union Ministers Piyush Goyal and Nirmala Sitharaman | ढाई किलो का हाथ, भाजपा के साथ; सनी देओल पंजाबमधून निवडणूक लढणार? 
ढाई किलो का हाथ, भाजपा के साथ; सनी देओल पंजाबमधून निवडणूक लढणार? 

ठळक मुद्देबॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशाला नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वाची गरज असल्याचं सनी देओल यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. देशाला नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वाची गरज असल्याचं सनी देओल यांनी म्हटलं आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'नरेंद्र मोदींनी या देशासाठी बरंच काही केलं असून पुढची पाच वर्ष त्यांनाच सत्ता मिळाली पाहीजे. माझे वडील अटल बिहारी वाजपेयींपासून भाजपासोबत जोडले गेले आणि मी नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपासोबत जोडलो गेलो आहे' असे सनी देओल यांनी म्हटलं आहे.  काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा व सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांना पंजाबमधून भाजपातर्फे लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सनी देओल यांची राष्ट्रवादी व देशभक्ताची प्रतिमा पाहून भाजपा त्यांना पंजाबमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतो. तथापि, त्यांच्याकडून निवडणूक लढवण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपाशी जोडले गेलेले आहेत. 2004 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत: ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी जो निवडणूक प्रचार करीत आहेत, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम त्यांचे पुत्र सनी देओलवरही होण्याची शक्यता आहे.


जाबमधील एका भाजप नेत्याने सांगितले की, सनी देओल यांनी पंजाबमधून निवडणूक लढवल्यास भाजपा मजबूत होईल. सनी देओल यांच्या देशभक्ताच्या प्रतिमेमुळे निवडणूक जिंकण्यास त्यांना चांगलीच मदत होणार आहे. 2017 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात अकाली दलासह लढणाऱ्या भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. 


 

English summary :
Panjab Lok Sabha Election 2019 : Bollywood actor Sunny Deol has joined the Indian public in the presence of Defense Minister Nirmala Sitaraman and Railway Minister Piyush Goyal. Sunny Deol has said that the country needs leadership like Narendra Modi. There is a possibility of contesting the elections on BJP ticket from Gurdaspur in Punjab.


Web Title: Actor Sunny Deol joins Bharatiya Janata Party in presence of Union Ministers Piyush Goyal and Nirmala Sitharaman
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.