पाकिस्तानात पोहोचल्यावर अभिनेत्री पूजा भट्ट म्हणते...

By admin | Published: October 27, 2016 08:10 PM2016-10-27T20:10:04+5:302016-10-27T20:36:25+5:30

उरी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंध कमालीचे ताणले आहेत, तर भारतीयांमध्ये पाकिस्तानविषयी रोष वाढत असताना बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट पाकिस्तानमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे.

Actor Pooja Bhatt says after reaching Pakistan | पाकिस्तानात पोहोचल्यावर अभिनेत्री पूजा भट्ट म्हणते...

पाकिस्तानात पोहोचल्यावर अभिनेत्री पूजा भट्ट म्हणते...

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 27 - उरी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंध कमालीचे ताणले आहेत, तर भारतीयांमध्ये पाकिस्तानविषयी रोष वाढत असताना बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट पाकिस्तानमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनल जियो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पूजा गुरूवारी कराचीमध्ये पोहोचली. पाकिस्तानात पोहोचल्यावर आनंद झाला, यापुर्वीही अनेकदा पाकिस्तानात मी येऊन गेली आहे असं तेथील मीडियासोबत बोलताना ती म्हणाली.  

भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याबाबत तिला विचारलं असता , 'भारत आणि पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू आहे. जर भारत - पाकिस्तानमध्ये येण्या-जाण्याचे मोर्ग मोकळे आहेत तर कलाकार येत जात राहणार' असं ती म्हणाली.
यापुर्वी एका भारतीय चॅनलसोबत बोलताना मुकेश भट्ट यांनी सात जन्म पाकिस्तानी कलाकारांना आपल्या चित्रपटात घेणार नसल्याचं म्हटलं होतं. 

Web Title: Actor Pooja Bhatt says after reaching Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.