Accidental death of four national hockey players | चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा अपघाती मृत्यू
चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देमित्राचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाचा घाला, तीन खेळाडू जखमी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
होशंगाबाद : ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धेचा उपांत्य सामना खेळण्यास जाणाऱ्या चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा सोमवारी अपघातातमृत्यू झाला. या घटनेत तीन अन्य राष्ट्रीय खेळाडूही जखमी झाले.
विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनासोबत टक्कर होऊ नये यासाठी कारचालकाने अचानक स्वत:ची कार वळवली. यातच त्याने वाहनावरील नियंत्रण गमविल्याने या खेळाडूंची कार एका झाडावर आदळून उलटली. ही दुर्दैवी घटना मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय राजमार्गावर ६९ वर रैसलपूर गावाजवळ सकाळी सातच्या सुमारास घडल्याचे होशंगाबाद ग्रामीण भागातील स्टेशन प्रभारी आशिष पनवार यांनी सांगितले.
हे सात खेळाडू रात्री मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इटारसीला गेले होते. आज सकाळी होशंगाबादला परत येत असतान ही घटना घडली.
मृतकांमध्ये शाहनवाज खान इंदूर, आदर्श हरदुवा इटारसी, आशिष लाल जबलपूर, आणि अनिकेत ग्वॉल्हेर यांचा समावेश आहे. हे सर्वजण १८ ते २२ वर्षांचे होते.जखमी खेळाडूंमध्ये शान ग्लॅडवीन (२२) आणि साहिल चौरे (१९) आणि अक्षय अवस्थी (१८) यांचा समावेश आहे.
शान आणि साहिल हे इटारसीचे तर अक्षय ग्वॉल्हेरचा रहिवासी आहे. तिघांना होशंगाबादच्या खासगी इस्पितळात दाखल करणयात आले. अपघात घडल्यानंतर जखमी खेळाडूंना तातडीने नजीकच्या इस्पिळात हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्पर्धा स्थगित...
दरम्यान ध्यानचंद हाौकी अकादमीचे सचिव नीरज राय बहोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार शान हा भोपाळच्या बरकतउल्ला विद्यापीठाचा तर अन्य सहा जण भोपाळच्या मध्यप्रदेश हॉकी अकादमीचे खेळाडू आहेत. या भीषण अपघातामुळे राज्याच्या क्रीडा क्षेत्रावर शोककया पसरली असून ध्यानचंद हॉकी स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली आहे.


Web Title: Accidental death of four national hockey players
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.