'गुजरातमध्ये AAPचे सरकार येणार, भाजप-काँग्रेसमध्ये गुप्त बैठका,' IBच्या रिपोर्टमध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 03:02 PM2022-10-02T15:02:06+5:302022-10-02T15:02:15+5:30

आपचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांनी IBच्या रिपोर्टचा हवाला देत, गुजरातमध्ये आपची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.

'AAP will form government in Gujarat, secret meetings between BJP-Congress,' claims IB report; says Arvind Kejriwal | 'गुजरातमध्ये AAPचे सरकार येणार, भाजप-काँग्रेसमध्ये गुप्त बैठका,' IBच्या रिपोर्टमध्ये दावा

'गुजरातमध्ये AAPचे सरकार येणार, भाजप-काँग्रेसमध्ये गुप्त बैठका,' IBच्या रिपोर्टमध्ये दावा

googlenewsNext

नवी दिल्ली: सध्या आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे भाजप आपली सत्ता कायम राहणार, असा दावा करत आहे. तर, दुसरीकडे आम आदमी पक्षाचे सरकार येणार, असे दावे आप नेत्यांकडून केले जात आहेत. यातच आता आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आयबीच्या(IB) रिपोर्टचा हवाला देत गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार (AAp in Gujarat) स्थापन होत असल्याचा दावा केला आहे. 

'भाजप काँग्रेसमध्ये गुप्त चर्चा'
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला. ते म्हणाले की, 'गुजरातच्या जनतेचे मी आभार मानतो. आयबीच्या रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये थोड्या फरकाने आपचे राज्य येणार आहे. ही रिपोर्ट पाहून भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे आता आम्हाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेससोबत मागच्या दाराने चर्चा सुरू केली आहे,' असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दरम्यान, आयबीच्या रिपोर्टमध्ये आम आदमी पक्षाचा विजय थोड्या फरकाने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र देश आणि राज्याच्या हितासाठी हा विजय अधिक मोठा करा, असे आवाहन केजरीवालांनी गुजरातच्या जनतेला केले आहे. आयबीचा हा अहवाल पाहिल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे, असा दावाही केजरीवाल यांनी माध्यमांसमोर केला. भाजपविरोधी मते वळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. यासाठी काँग्रेसही भाजपला आतून मदत करत आहे. आपची मते कमी करण्यासाठी भाजप-काँग्रेस एकत्र आले, असा दावाही त्यांनी यावेळी केलाय.

प्रति गाय प्रतिदिन 40 रुपये देण्याचे आश्वासन
अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आश्वासनाचा पुनरुच्चार केला. गुजरातमध्ये सरकार बनताच तेथील गायींसाठी विशेष भत्ता दिला जाईल, असे सांगितले. हा भत्ता प्रति गाय प्रतिदिन 40 रुपये असेल. त्यांनी गुजरातच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले. भाजपचे लोक गोंधळ घालण्यासाठी सर्व युक्त्या अवलंबू शकतात, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते. हे दोन्ही नेते सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. 

Web Title: 'AAP will form government in Gujarat, secret meetings between BJP-Congress,' claims IB report; says Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.