'... म्हणून उत्तराखंडमध्ये 70 जागांवर निवडणूक लढवणार आम आदमी पार्टी' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:51 PM2020-08-20T12:51:49+5:302020-08-20T12:52:30+5:30

उत्तराखंडमध्ये सध्या पक्षाचं मोठं नेटवर्क नाही, तरीही पक्ष 70 जागांवर निवडणूक लढविण्याच तयारी करतोय, याबाबत केजरीवाल यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, ही वस्तुस्थिती असली तरी, लोकांच्या उमेदीवर निवडणुका लढवल्या जातात, असे केजरीवाल यांनी म्हटले.

Aam Aadmi Party to contest 70 seats in Uttarakhand, arvind kejriwal | '... म्हणून उत्तराखंडमध्ये 70 जागांवर निवडणूक लढवणार आम आदमी पार्टी' 

'... म्हणून उत्तराखंडमध्ये 70 जागांवर निवडणूक लढवणार आम आदमी पार्टी' 

Next
ठळक मुद्देदिल्लीतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये झालेल्या बदलांमुळे उत्तराखंडच्या जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला आहे. पक्षाच्या सर्व्हेनुसार 62 टक्के नागरिकांना वाटते की, आम आदमी पक्षाने तेथे निवडणूक लढवावी. 

पंजाब आणि गोव्यानंतर उत्तराखंड हे तिसरं राज्य आहे, जिथं आम आदमी पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहे. त्यामुळेच, पुढील आठवड्यात उत्तराखंडमधील 70 जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा आम आदमी पक्षाकडून होणार आहे. दीड महिन्यांपूर्वीच उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाने केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षावरुन पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातूनच उत्तराखंडला कर्मभूमी बनविण्याचा निश्चयही पक्षाने केल्याचे पक्षप्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. 

उत्तराखंडमध्ये सध्या पक्षाचं मोठं नेटवर्क नाही, तरीही पक्ष 70 जागांवर निवडणूक लढविण्याच तयारी करतोय, याबाबत केजरीवाल यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, ही वस्तुस्थिती असली तरी, लोकांच्या उमेदीवर निवडणुका लढवल्या जातात, असे केजरीवाल यांनी म्हटले. लोकांच्या आशा-अपेक्षा सोबत असतील आणि नेत्यांची नियत साफ असेल, तर संघटन तयाार व्हायला वेळ लागत नाही, असेही केजरीवाल यांनी म्हटले. दिल्लीतही पक्षाकडे संघटना नव्हती, मात्र पक्षाची स्थापना होताच दोन वर्षात आम आदमी पक्षाने सव्वाशे वर्षांच्या जुन्या व प्रबळ काँग्रेसचा पराभव केल्याची आठवणही केजरीवाल यांनी करुन दिली. 

दिल्लीतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये झालेल्या बदलांमुळे उत्तराखंडच्या जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला आहे. पक्षाच्या सर्व्हेनुसार 62 टक्के नागरिकांना वाटते की, आम आदमी पक्षाने तेथे निवडणूक लढवावी. 
 

Web Title: Aam Aadmi Party to contest 70 seats in Uttarakhand, arvind kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.