AAI विमानतळांच्या मॉडिफीकेशनवर 25 हजार कोटी खर्च करणार, अदानींकडे 7 विमानतळांचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 05:08 PM2021-12-07T17:08:06+5:302021-12-07T17:08:06+5:30

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने(AAI)ने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप(PPA) अंतर्गत संचालन, व्यवस्थापन आणि विकासासाठी आतापर्यंत 8 विमानतळ भाड्याने दिली आहेत. यापैकी 7 विमानतळ गौतम अदानींच्या कंपनीच्या ताब्यात आहेत.

AAI to spend Rs 25,000 crore on airport modification, Adani owns 7 airports under PPA scheme | AAI विमानतळांच्या मॉडिफीकेशनवर 25 हजार कोटी खर्च करणार, अदानींकडे 7 विमानतळांचा ताबा

AAI विमानतळांच्या मॉडिफीकेशनवर 25 हजार कोटी खर्च करणार, अदानींकडे 7 विमानतळांचा ताबा

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) कोरोनामुळे डबघाईला आलेल्या देशातील विमान वाहतूक क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी पुढील पाच वर्षांत सुमारे 25000 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत विविध विकास कामे केली जातील नागरी उड्डयन मंत्रालयाच्या माहितीनुसार, 25000 कोटी रुपयांची रक्कम सध्याच्या टर्मिनलचे रिनोव्हेशन, नवीन टर्मिनल तयार करणे, धावपट्ट्यांची दुरुस्ती, विमानतळ नेव्हिगेशन सेवा, कंट्रोल टॉवर्स, तांत्रिक ब्लॉकचा विस्तार इत्यादींवर खर्च होईल.

हजारो कोटींची गुंतवणूक
पुनरुज्जीवन उपायांपैकी, दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरू येथील सार्वजनिक-खाजगी भागीदारी विमानतळांनी 2025 पर्यंत 30000 कोटी रुपयांच्या मोठ्या विस्तार योजना सुरू केल्या आहेत. याव्यतिरिक्त, सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत देशभरातील नवीन ग्रीनफिल्ड विमानतळांच्या विकासासाठी 36000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखण्यात आली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

8 विमानतळे कार्यान्वित
मंत्रालयाने पुढे सांगितले की, केंद्राने देशभरात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यासाठी “तत्त्वतः” मान्यता दिली आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल डॉ. व्ही के सिंह यांनी संसदेत सांगितले की, आतापर्यंत आठ ग्रीनफिल्ड विमानतळ- महाराष्ट्रातील शिर्डी आणि सिंधुदुर्ग, पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पाक्योंग, केरळमधील कन्नूर, आंध्र प्रदेशातील ओरवाकल, कर्नाटकातील कलबुर्गी, उत्तर कुशीनगरमध्ये कार्यान्वित झाले आहे.

GST कमी केला

याव्यतिरिक्त, विमानतळांची देखभाल, दुरुस्ती आणि सेवांवर लावला जाणारा वस्तू आणि सेवा कर(GST) 18% वरुन 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे. मंत्रालयाने सांगितले की, विमान भाडेतत्वावर आणि वित्तपुरवठा करण्यासाठी अनुकूल वातावरण सक्षम केले गेले आहे. याव्यतिरिक्त, मंत्रालयाने माहिती दिली की, भारतीय वाहकांनी तैनात केलेल्या मालवाहू विमानांची संख्या 2018 मध्ये 7 वरुन 2021 मध्ये 28 पर्यंत वाढली आहे.

8 पैकी ही 7 विमानतळे अदानीकडे सोपवली

AAI ने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPA) अंतर्गत ऑपरेशन, व्यवस्थापन आणि विकासासाठी आतापर्यंत आठ विमानतळ भाड्याने दिले आहेत. यापैकी 7 विमानतळांचे गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडकडे देण्यात आले आहेत. सरकारने सोमवारी संसदेत ही माहिती दिली. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

ही विमानतळे भाड्याने दिली
त्यांनी पुढे सांगितले की, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू हे सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत ऑपरेशन, व्यवस्थापन आणि विकासासाठी भाडेतत्त्वावर दिले आहेत. यापैकी सात विमानतळ - मुंबई, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड द्वारे व्यवस्थापित केले जातात.
 

Web Title: AAI to spend Rs 25,000 crore on airport modification, Adani owns 7 airports under PPA scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.