महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:41 IST2025-12-09T17:41:16+5:302025-12-09T17:41:40+5:30
Crime News: विवाहबाह्य संबंध तसेच विवाहित स्त्री-पुरुषांच्या प्रेमप्रकरणांच्या घटना गेल्या काही काळापासून सर्रासपणे कानावर येत आहेत. तसेच त्याबाबत ऐकून लोकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत असतात. दरम्यान, बिहारमधील किसनगंज येथून असंच एक प्रेमप्रकरण उघडकीस आलं आहे.

महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
विवाहबाह्य संबंध तसेच विवाहित स्त्री-पुरुषांच्या प्रेमप्रकरणांच्या घटना गेल्या काही काळापासून सर्रासपणे कानावर येत आहेत. तसेच त्याबाबत ऐकून लोकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत असतात. दरम्यान, बिहारमधील किसनगंज येथून असंच एक प्रेमप्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एक विवाहित महिला एका विवाहित तरुणाच्या प्रेमात पडली होती. इन्स्टाग्रामवरून त्या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं होतं.
दरम्यान, सुमारे सहा महिने सुरू असलेली ऑनलाईन चॅटिंग आणि फोनाफोनीनंतर या दोघांमधी जवळीक एवढी वाढली की, सदर महिला बकरीला चरायला नेण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली आणि थेट पाटण्याला पोहोचली. नातेवाईकांनी जेव्हा तिचा शोध घेतला तेव्हा ती बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी शोध सुरू केला आणि तसेच महिलेचं लोकेशन ट्रेस करत पोलीस पाटणा येथील एस.के.पुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवपुरी परिसरात पोहोचले. तिथून पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतले.
दरम्यान, या महिलेसोबत तिचा प्रियकर सनी कुमार हासुद्धा सापडला. सनी कुमार हा पेशाने सलूनचालक आहे. तसेच पाटणा येथे हेअर कटिंग सलूनमध्ये तो काम करतो. सनीने पोलिसांना सांगितले की, इन्स्टाग्रामवरून आमची मैत्री झाली होती. त्यानंतर आम्ही एकमेकांना मोबाईल नंबर दिले. तसेच फोनवर बोलता बोलता आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. चार दिवसांपूर्वी सदर महिला स्वत: पाटणा येथे आली. तसेच तिने मलाही बोलावले. माझंही लग्न झालंय. पण माझी पत्नी मला सोडून गेली आहे. सध्या ही महिला आणि या तरुणाला गांधी मैदान पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.