80 वर्षीय आजीबाईचा जगण्यासाठी संघर्ष, कणसं विकून 2 नातवांचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 05:41 PM2021-07-30T17:41:29+5:302021-07-30T17:44:19+5:30

दिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय दिव्यांग रामबेटी यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पोटात कालवणारा आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही बाजारात भाजलेली कणसं विकून त्या आपला उदरनिर्वाह चालवतात.

80-year-old grandmother rambeti struggles to survive, sells grain and takes care of 2 grandchildren in delhi | 80 वर्षीय आजीबाईचा जगण्यासाठी संघर्ष, कणसं विकून 2 नातवांचा सांभाळ

80 वर्षीय आजीबाईचा जगण्यासाठी संघर्ष, कणसं विकून 2 नातवांचा सांभाळ

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय दिव्यांग रामबेटी यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पोटात कालवणारा आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही बाजारात भाजलेली कणसं विकून त्या आपला उदरनिर्वाह चालवतात.दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या आजीबाईच्या घरी भेटू देऊन त्यांची आर्थिक परस्थिती आणि घरगुती माहिती घेतली. त्यानंतर, रामबेटी यांना मदतीचा हात देऊ केला आहे.

नवी दिल्ली - माणसाच्या आयुष्यात सर्वात सुखदचा काळ म्हणजे म्हातारपणीचा काळ असं म्हटलं जातं. मुला-बाळांची लग्न केल्यानंतर, आपलं आयुष्याचं कर्तव्य बजावल्यानंतर साठीनंतर घरी बसून आरामात जुन्या आठवणींना उजाळा देत आयुष्य जगायचं असतं. मात्र, प्रत्येकाच्याच नशिबी हे सुख नसतं. अनेकांना उतारवयातही संघर्ष आणि दोन वेळच्या जेवणासाठी दररोज काम करावे लागते. दिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय रामबेटी यांचीही अशीच कहानी आहे. 

दिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय दिव्यांग रामबेटी यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पोटात कालवणारा आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही बाजारात भाजलेली कणसं विकून त्या आपला उदरनिर्वाह चालवतात. विशेष म्हणजे त्यांच्या पाठीचं हाड मोडल्याने चालताना त्रास होतो. या आजीबाईला संपूर्णता वाकून चालावे लागते, तरीही रामबेटी परिसरातील फिरून भाजलेली कणसं विकतात. 2 नातवंडांचा मोठ्या जिद्दीने सांभाळ करतात. केट्टो या संस्थेच्या सहाय्याने त्यांना मदत करण्यात येत आहे. 


दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या आजीबाईच्या घरी भेटू देऊन त्यांची आर्थिक परस्थिती आणि घरगुती माहिती घेतली. त्यानंतर, रामबेटी यांना मदतीचा हात देऊ केला आहे. तसेच, या आजीबाईला मदत करण्याचं आवाहनही मालीवाल यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. 

Web Title: 80-year-old grandmother rambeti struggles to survive, sells grain and takes care of 2 grandchildren in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.