केंद्र सरकारमधील तब्बल पावणेसात लाख पदे रिक्त; कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 04:53 AM2020-02-06T04:53:25+5:302020-02-06T06:16:17+5:30

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील ६ लाख ८३ हजार पदे रिक्त असल्याची माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली.

7 Lakhs of vacant posts in central government; Employee recruitment process started | केंद्र सरकारमधील तब्बल पावणेसात लाख पदे रिक्त; कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू

केंद्र सरकारमधील तब्बल पावणेसात लाख पदे रिक्त; कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील ६ लाख ८३ हजार पदे रिक्त असल्याची माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली. कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, केंद्र सरकारमध्ये एकूण ३८ लाख २ हजार ७७९ मंजूर पदे असून, त्यापैकी ३१ लाख १८ हजार ९५६ पदांवर अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च, २0१८ रोजी ६ लाख ८३ हजार ८२३ पदे रिकामी होती. निवृत्ती, राजीनामा, मृत्यू, पदोन्नती, यांमुळे ही पदे रिक्त झाली असून, ती भरण्याची प्रक्रिया संबंधित खात्यांतर्फे ठरवून दिलेल्या नियमांनुसार सुरू असते.

जितेंद्र सिंह म्हणाले की, २0१९-२0 या आर्थिक वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन बोर्ड व रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड यांनी १ लाख ३४ हजार पदे भरण्याची शिफारस आम्हाला केली आहे. त्यापैकी सर्वाधिक १ लाख १६ हजार ३९१ पदे भरण्यात यावीत, असे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने सांगितले आहे. स्टाफ सिलेक्शन बोर्डाने १३ हजार ९९५ तर केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४,३९९ पदे भरण्याची शिफारस केली आहे. रेल्वे बोर्ड व स्टाफ सिलेक्शन बोर्ड यांच्याखेरीज पोस्टल सर्व्हिस बोर्ड आणि संरक्षण मंत्रालय यांनी ३ लाख १0 हजार ८३२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात नागरी संरक्षण दलातील २७ हजार ६५२ जागाही भरण्यात येत आहेत.

ठरवून दिलेल्या मुदतीत पदे भरा

सर्व खात्यांना व मंत्रालयांना रिक्त पदे ठरवून दिलेल्या मुदतीत भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसे करणे शक्य व्हावे, यासाठी उमेदवारांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत असून, अराजपत्रित पदांसाठीच्या मुलाखती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच जी तात्पुरती पदे आहेत, ती ताबडतोब भरावीत आणि त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांकडून काही गुन्हे घडले आहेत का वा त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे का, हे तपासून घ्यावे, अशा सूचना दिल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: 7 Lakhs of vacant posts in central government; Employee recruitment process started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.