आसाममध्ये बसचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 02:49 PM2020-02-04T14:49:34+5:302020-02-04T14:52:33+5:30

आसाममधील गोलपारा जिल्ह्यात एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

7 dead and many feared injured after the bus they were travelling in fell into a gorge in Dhupdhara | आसाममध्ये बसचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी 

आसाममध्ये बसचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी 

Next
ठळक मुद्देआसाममधील गोलपारा जिल्ह्यात एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी.जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिसपूर - आसाममधील गोलपारा जिल्ह्यात एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात काही जण हे गंभीर जखमी झाले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (4 फेब्रुवारी) आसामच्या गोलपारामध्ये एक बस पलटी होऊन भीषण अपघात झाला.

धुबरीवरून ही बस गुवाहाटीला जात होती. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या विजेच्या खांबावर आदळली आणि पलटी झाली.या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास 30 लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी आसामच्या सिबसागर जिल्ह्यात देखील एक भीषण अपघात झाला होता. यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. 

महत्त्वाच्या बातम्या 

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत गृहमंत्रालयाने लोकसभेत केली मोठी घोषणा

...म्हणून त्याने विमानात बॉम्ब असल्याची पसरवली अफवा

Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण 

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत गृहमंत्रालयाने लोकसभेत केली मोठी घोषणा

Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित

 

Web Title: 7 dead and many feared injured after the bus they were travelling in fell into a gorge in Dhupdhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.